मेहकर :तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्यावतीने ह्यगाव माझी शाळाह्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये तालुक्यातील १३ गावातील शाळांचा उपक्रम पुर्ण झाला आहे. या उपक्रमाच्यामाध्यमातून संपुर्ण गावालाच शाळा बनविण्यात आले असून; त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात चालता बोलता भर पडत आहे. हा उपक्रम संपूर्ण राज्यासाठी पथदश्री असा ठरला आहे.
शिक्षण विभागाच्यावतीने प्रायोगिक तत्वावर ह्यगाव माझी शाळाह्ण हा उपक्रम राबविण्यात येत आहे. प्राथमिक शिक्षणात क्रांती घडवुन आणणारा, विद्यार्थ्यांच्या ज्ञानात चालता बोलता भर घालणारा तसेच गुणवत्ता वाढीस चालना देणारा ह्यगाव माझी शाळाह्ण या उपक्रमासाठी महाराष्ट्रातुन पुणे जिल्ह्यातील भोर तालुका आणि बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुका निवडण्यात आला आहे. त्यामध्ये मेहकर तालुक्यातील ४२ शाळांचा समावेश आहे. सद्यस्थितीत चिंचोली बोरे, देऊळगांव माळी, हिवरा बु., वाघदेव, बार्हई, खंडाळा, जामगांव, अंजनी बु., हिवरा खु., दादुल गव्हाण, उटी, डोणगांव मुले, अंत्री देशमुख येथील जिल्हा परिषद मराठी शाळेने ह्यगांव माझी शाळाह्ण उपक्रम राबविण्यास सुरूवात केली आहे.
या उपक्रमांतर्गत लोकसहभागातून वर्गनी जमा करुन गावातील भिंतीवर एक ते सात पर्यंतचा आभ्यासक्रम रंगविण्यात आला आहे. तालुक्यातील १३ जि.प. शाळांनी गावातील सर्वच भिंतीवर पहिली ते सातवी पर्यंतच्या आभ्यासातील मराठी, इंग्रजी शब्दार्थ, तक्ते, गणीताची सुत्रे, चित्रे, पाढे, मुळाक्षरे, उजळणी, अंकओळख, मुलभूत प्रक्रीया, वर्तुळाच्या आकृती तसेच विविध प्रकारची गणिते काढुन भिंती बोलक्या केल्या आहेत. गावातील गल्लीबोळातही पहिली ते सातवी पर्यंतचा महत्वाचा अभ्यास पाहायला मिळत आहे. या उपक्रमामुळे तालुक्यातील १३ गावांमध्ये शाळेचे प्रतिबिंबच निर्माण झाले आहे.
सदर उपक्रम हा गटशिक्षणाधिकारी किशोर पागोरे, केंद्र प्रमुख प्रकाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व लोकवर्गणीतून करण्यात आला आहे. त्यासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांनी परिश्रम घेतले आहेत. ह्यगाव माझी शाळाह्ण या उपक्रमाची जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, शिक्षण उपसंचालक राम पवार तसेच इतर अधिकार्यांनी पाहणी केली असुन या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले आहे. तालुक्यातील १३ गावांतील शाळेंनी राबविलेल्या या उपक्रमाची शिक्षकांनी पाहणी केली