अक्षय चोरगे । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शाळा सुरू होण्यासाठी आठवडा शिल्लक असल्याने दप्तर, वॉटरबॅग, शूज, छत्री, रेनकोट, वह्या, पुस्तके आणि गणवेश खरेदीसाठी पालकांसह मुलांची लगबग उडाली आहे. मुंबईतील मोठ्या मार्केटसह लहान बाजारांत शालेय साहित्यासाठी गर्दी होत असून, यात क्रॉफर्ड मार्केट, दादर, मशिद बंदर, कुर्ला आणि मानखुर्द या बाजारपेठांचा समावेश आहे.शालेय साहित्याची खरेदी करताना, कार्टुन्सची छायाचित्र असलेल्या साहित्यांवर अधिक भर दिला जात आहे. दप्तर, टिफीन, वॉटरबॅगला आणि कंपासपेटीवर कार्टुन्सची छायाचित्र असून, या साहित्याला अधिक मागणी आहे. यामध्ये थ्रीडी चित्रे आणि साधी चित्रे असणारे साहित्य, असे दोन प्रकार आहेत, असे कुर्ला येथील विक्रेत्यांनी सांगितले. शाळा सुरू झाल्या की, मुलांना नवा गणवेश आणि वह्या-पुस्तकांसह नवी कंपासपेटी, वॉटरबॅग, टिफीन बॉक्सही हवा असतो. त्यात आपल्याकडे सर्वांपेक्षा हटके बॅग, हटके कंपासपेटी असावी, असा मुलांचा आग्रह असतो. मुलांच्या या अपेक्षाला खऱ्या उतरतील, अशा थ्रीडी चित्रे असलेल्या साहित्यांनी बाजार फुलला आहे.दादर येथील मार्केटमध्ये कार्टुन्सची चित्रे असलेली दप्तरे दाखल झाली आहेत. परंतु हे साहित्य यंदा दहा ते पंधरा टक्क्यांनी महागले आहे, असे विक्रेत्यांनी सांगितले.साहित्याचे दरकंपासपेटी (साधी) : २० ते ४० रुपयेकंपासपेटी (कार्टुन्स चित्र) : ३० ते १२० रुपयेकंपासपेटी (थ्रीडी चित्र) : ६० ते १५० रुपयेटिफीन बॉक्स (साधा) : ३० ते ६० रुपयेटिफीन बॉक्स (कार्टुन्स चित्र) : ५० ते १०० रुपयेवॉटर बॅग (साधी) : ३० ते ५० रुपये वॉटर बॅग (कार्टुन्स चित्र) : ५० ते ८० रुपयेनायलॉनची बॅग : २०० ते ४०० रुपयेचिनी बॅग (साधे चित्र) : ५०० ते ६०० रुपयेचिनी बॅग (थ्रीडी चित्र) : ७०० ते १५०० रुपये कार्टुन्सची चित्रे असलेल्या वॉटरबॅग, टिफीन बॉक्स, कंपासपेट्या यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. शाळा सुरू व्हायला अद्याप एक आठवडा उरला आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात ही मागणी वाढेल. यांच्या किमती ३० रुपयांपासून १२० रुपयांपर्यंत आहेत.- अजयसिंग चौटाला, विक्रेतागेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वह्या-पुस्तकांच्या किमतीत २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. - दीपक निकम, व्यवस्थापक महाराष्ट्र स्टोअर्स, कुर्लाकार्टुन्सची चित्रे असलेल्या साहित्यांना मागणी आहे. लहान मुले अशी चित्रे असलेल्या साहित्यासाठी हट्ट करत आहेत. कंपासपेटी, वॉटरबॅग, टिफीन बॉक्सच्या किमती वाढलेल्या नसल्या, तरी बॅगच्या किमतीमध्ये दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे.- सुभाष यादव, विक्रेतापुस्तकांच्या किमतींमध्ये वाढ झालेली नाही. यावर्षी आम्ही वह्या मागील वर्षीच्या किमतीतच विकत आहोत; परंतु दरवर्षी वह्यांच्या किमतीत एका वहीमागे चार ते पाच रुपये वाढवले जातात.- आशा आवटी, भारत बुक डेपो, गिरगाव
शालेय साहित्य महागले
By admin | Published: June 08, 2017 2:16 AM