मुंबई: शाळेतून विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा म्हणून शाळेत पोषण आहार दिला जातो. पण, शाळेत येणाºया आहाराच्या दर्जावरुन शंका उपस्थित केली जाते. शालेय विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा म्हणून पोषण आहारासंदर्भात आलेल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी पालिका शालेय विभागाने नवीन शक्कल लढविली आहे. शाळेत येणाºया आहाराचा दर्जा तपणासण्यासाठी शालेय स्तरावर एक समिती गठित करण्याची सूचना मुख्याध्यापकांना केली आहे.शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणाºया आहारामध्ये आरोग्याचा विचार करत नाहीत. शाळेतच समिती असल्यास तक्रारींचे लवकर आणि योग्य पद्धतीने निवारण होईल. ही समिती आठवड्यातून एक दिवस शालेय पोषण आहाराचा दर्जा तपासण्याची सूचना विभागातर्फे देण्यात आली आहे. आहाराबाबत कोणत्याही तक्रार असल्यास संबंधित कंत्राटदाराचे काम रद्द करण्याचे शिफारस वरिष्ठांकडे करावी, अशी ताकीददेखील देण्यात आली आहे. सोबतच विद्यार्थ्यांना देण्यात येणाºया आहाराबाबात योग्य ती काळजी घेण्याची ताकीद देण्यात आली आहे.आहारामध्ये रोजच्या रोज काही वाबी तपासणे गरजेचे असल्याचे सांगितले आहे. यात विद्यार्थ्यांना आहार खाण्यास देण्यापूर्वी आहाराचा नमुना बाजूला काढून ठेवावा. अन्नाला आंबूस वास, कच्चे अन्न, बेचव अन्न, कमी प्रमाणात स्निग्धांश असलेले, भेसळे असलसेले अन्न विद्यार्थ्यांना वितरीत न करण्याची सूचना देण्यात आली आहे. आहाराचा नमुना महिन्यातून कमीत कमी एकदा किंवा आवश्यकेतनुसार जास्त वेळेस पालिकेच्या जी उत्तर विभागातील प्रयोग शाळेत पाठवावा. तसेच ज्या संस्थेकडून अन्न शिजविले जात आहे, त्या संस्थेच्या स्वयंपाकगृहात मुख्याध्यापकांनी किंवा वरिष्ठ शिक्षकांनी भेट देणे अपेक्षित आहे.
शालेय पोषण आहारावर आता शिक्षण विभागाचा ‘वॉच’, दर्जावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 4:14 AM