शहरं
Join us  
Trending Stories
1
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
2
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
3
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
4
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
5
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
6
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
8
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
9
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
10
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
11
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
12
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
14
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
15
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
16
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
17
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
18
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
19
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!

भिंत पडल्याने शाळा राहिली बंद

By admin | Published: July 28, 2016 5:55 PM

भोरटेक येथील जि.प. प्राथमिक शाळेची भिंत पडल्याच्या घटनेचा विद्यार्थी व पालकांनी धसका घेतला असून यामुळे दुसऱ्या दिवशी कोणीच विद्यार्थी शाळेत न आल्याने शाळा बंद राहिली.

भडगाव : भोरटेक येथील जि.प. प्राथमिक शाळेची भिंत पडल्याच्या घटनेचा विद्यार्थी व पालकांनी धसका घेतला असून यामुळे दुसऱ्या दिवशी कोणीच विद्यार्थी शाळेत न आल्याने शाळा बंद राहिली.  या घटनेत तीन-चार विद्यार्थी जखमी झाले होते. घटनेमुळे विद्यार्थी वर्ग कमालीचा घाबरला असून २८ रोजी शाळेत एकही विद्यार्थी आला नाही. यामुळे आता शाळा कधी सुरु होईल असा प्रश्न उभा राहिला आहे.

अनेक जण मदतीस सरसावलेभिंत कोसळताच स्थानिक नागरिकांसह कजगावचेही अनेक जण मदतीसाठी धावून गेले होते. दरम्यान मातीचा ढिगार उपसण्याची काम सुरु झाले आहे. सरपंच तुकाराम जाधव, उपसरपंच राजेंद्र धनगर, सदस्य सुनील महाजन, उमेश देशमुख, मंगा नाईक, गुलाब पाटील, जिभाऊ महाजन, भिकन महाजन, पुंजू महाजन, बाबूलाल कोळी, हनुमान कोळी, शालिक पाटील, भैया पाटील, कौतिक धनगर, अर्जुन धनगर, धुडकू महाजन, संजय धनगर, नामदेव पाटील, गंभीर महाजन, दगडू महाजन, पंडित महाजन, अशोक पाटील, दत्तू धनगर, राजू कोळी आदींनी मदत केली. जेसीबी मशीनही घटनास्थळी आणले. कजगावचे दिनेश पाटील, कमलचंद धाडीवाल, छोटू जैन आदींनीही यासाठी सहकार्य केले.

अधिकाऱ्यांच्या भेटीघटना घटताच अनेक अधिकाऱ्यांनी भेट दिली. २८ रोजी जिल्हा शिक्षण अधिकारी बी.जे. पाटील, उपशिक्षणाधिकारी डॉ.देवांग, सर्व शिक्षा अभियानचे जिल्हा इंजिनिअर मृदुल अहिरराव, शिक्षण विस्तार अधिकारी व्ही.आर.कुमावत, कजगाव केंद्र प्रमुख कोमलसिंग पाटील, भडगाव पं.स. माजी उपसभापती संभाजी भोसले यांनीही भेट देवून पाहणी केली. शिक्षणाधिकारी यांनी यावेळी पर्यायी व्यवस्था तातडीने करण्याच्या सूचना दिल्याग्रा. पं. कार्यालय आणि

अंगणवाड्याही धोकादायक स्थितीत१९६२ ते ६५ मध्ये बांधलेल्या या शाळेची इमारत जीर्ण झाली असून सुदैवाने कोणतीही मोठी हानी झाली नाही. तसेच भोरटेक ग्रा.पं.ची इमारत देखील त्याच काळात उभारली गेली. ती देखील जीर्ण झाली आहे. या इमारतीवर वरुन प्लास्टीक टाकण्यात आले आहे. या इमारतीत ग्रा.पं. कार्यालय, तलाठी कार्यालय कार्यरत आहे. या इमारतीत नेहमीच मोठी वर्दळ असते. तसेच याच समोरील अंगणवाडी अवस्था, ग्रुप ग्रा.पं. अंतर्गत असलेल्या उमरखेड या आदिवासी वस्तीतील अंगणवाडीची अवस्था, ग्रा.पं.च्या जलकुंभाची अवस्था अतिशय पडकी झाली असून या ठिकाणीही मोठी दुर्घटना होऊ शकते. याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

सरपंचांकडून अनेकदा निवेदनभोरटेक येथील जलकुंभाबाबत सरपंच तुकाराम जाधव यांनी २५ मार्च २०१६ रोजी ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जि.प. जळगाव यांना पत्र देवून हा जलकुंभ पाडण्यास सांगितले आहे. परंतु अनेकदा पाठपुरावा करुनही कार्यवाही झाली नाही. १४ डिसेंबर २०१५ रोजी गटविकास अधिकारी भडगाव यांना पत्र देवून जीर्ण झालेल्या अंगणवाडीमुळे नवीन अंगणवाडी मिळविण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे. २३ डिसेंबर १५ रोजी गटविकास अधिकारी भडगाव यांना पत्र देवून भोरटेक ग्रा.पं.साठी नवीन इमारत मंजुरीसाठी पत्र दिले आहे. कारण ग्रा.पं. इमारतही जीर्ण झाली आहे.. २७ रोजीच्या घटनेमुळे पाल्य व पालक दोघेही भयभीत झाले आहे. गाव लहान असून शाळा भरवण्यासाठी जागा उपलब्ध नाही भवानी माता मंदिराजवळील चावडीत दोन वर्गाचे विद्यार्थी तर वि.का.सोसायटीच्या इमारतीत दोन वर्ग तूर्त बसवण्याची व्यवस्था झाली आहे. जि.प.ने शाळेच्या प्रांगणात त्वरित टेंट उभारुन शाळेची तात्पुरती व्यवस्था करुन नवीन इमारतीचे काम युध्दपातळीवर सुरु करावे. टेंटचे काम १५ दिवसात मार्गी न लागल्यास शाळा बंद करु -तुकाराम जाधव, सरपंच