शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
2
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
3
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
4
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!
5
भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी
6
SBI On MTNL: संकटात आली 'ही' सरकारी कंपनी; आता SBI नं केली मोठी कारवाई, शेअर आपटला
7
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
हार्दिक पांड्याशी घटस्फोटानंतर नताशाचं जबरदस्त कमबॅक, शूटिंग सेटवरील व्हिडिओ समोर
9
शरद पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या महिला नेत्याशी व्यासपीठावर छेडछाड
10
Bihar Politics : नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी; JDU कडून पोस्टरबाजी; भाजपचाही पाठिंबा
11
अरे देवा! मालगाडीचे २ डबे घसरले; बादल्या, कॅन घेऊन डिझेल लुटण्यासाठी लोकांची झुंबड
12
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
13
राहुल गांधी कोल्हापूरात पोहचताच उचगावातील कौलारू घरात गेले, तिथे कोणाला भेटले? 
14
Weightless Tips: अमित शाहांनीसुद्धा 'या' पद्धतीने केले २५ किलो वजन कमी; सांगताहेत बाबा रामदेव!
15
IPO च्या तयारीत असलेल्या NSE ला सेबीकडून दिलासा; SEBIच्या इतिहासातील मोठ्या सेटलमेंटसाठी मंजुरी
16
NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात
17
बायकोसाठी गाव सोडणार नाही तर बदलणार! आदिनाथ कोठारेच्या 'पाणी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
18
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS
19
Navratri Puja Vidhi 2024: इच्छित मनोकामनापूर्ती करणारे 'काम्य व्रत' ललिता पंचमीला कसे करायचे? वाचा!
20
'आनंद आहेच पण आता...'; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची मार्मिक पोस्ट

शालेय विद्यार्थ्यांनी घेतला हवाई सफरचा निखळ आनंद; ‘लोकमत’मधील ‘आई संस्कारधन’ स्पर्धेमुळे मिळाली संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2024 9:48 AM

दिल्लीतील ऐतिहासिक स्थळांना भेटी, विद्यार्थी गेले भारावून

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील पहिलाच विमान प्रवास. विमान कसे असेल, कसे उडते याविषयीची प्रचंड उत्सुकता ताणली होती. त्यानंतर थेट विमानात बसूनच हवाई सफर करण्याची संधी मिळाली. या सहलीचा राज्यभरातील विद्यार्थ्यांनी निखळ आनंद घेतला. ही संधी ‘लोकमत’मधील ‘आई संस्कारधन’ स्पर्धेमुळे मिळाली.  दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक स्थळांना  भेटी दिल्या. 

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासह वृत्तपत्र,  साहित्य वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी ‘लोकमत’मध्ये  ‘आई संस्कारधन’ ही स्पर्धा घेण्यात आली. ‘लोकमत’च्या अंकातून प्रसिद्ध होणाऱ्या आईवरील लेखांचे वाचन करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावयाची होती. ते कूपन कट करून प्रवेशिकांवर चिकटवायचे होते. या स्पर्धेत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून लकी ड्राॅच्या माध्यमातून एका विद्यार्थ्याची निवड केली. या विजेत्या विद्यार्थ्यांना दिल्ली हवाई सफर घडविली. 

३४ विद्यार्थ्यांनी दिल्लीमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे समाधीस्थळ राजघाट, इंडिया गेट, महाराष्ट्र सदन, संसद, राष्ट्रपती भवनासह इतर ठिकाणी भेटी दिल्या. ही हवाई सफर ‘लोकमत’चे उपाध्यक्ष (वितरण) वसंत आवारी यांच्या मार्गदर्शनात संजय पाटील, रविराज अंबडवार, नरेंद्र तांबोळी यांनी यशस्वी केली. 

या शाळांचे विद्यार्थी विजेतेअहमदनगर रूद्रा दहातोंडे, भाऊसाहेब फिरोदिया स्कूल,  अकोला तन्मय टाले, नोएल स्कूल, अमरावती राधिका गेडाम दीपा इंग्लिश स्कूल, बीड शशांक टेकाळे, चंपावती विद्यालय, बुलढाणा निशांतसिंग चव्हाण, संत अन्स इंग्लीश मिडीयम स्कूल, भंडारा ओशन मेश्राम, सेंट पीटर स्कूल, चंद्रपुर ब्रम्हपुरीच्या मुग्धा रणदिवे, क्रीष्टानंद स्कूल, छत्रपती संभाजीनगर पूजा ढाकरे, मुकुल मंदिर सिडको, धुळे रितेश भामरे, जयहिंद हायस्कूल, धाराशीव आर्यन नाईक, तुळजामाता इंग्लीश स्कूल तुळजापुर, गोदिंया अर्जुनी मोरगाव, शरयू कहाळकर, सरस्वती विद्यालय, गडचिरोली प्रज्वल  कुलसुंगे, वत्सलाबाई वनमाळी स्कूल, गोवा नॉर्थ म्हापसा स्वलेशा बाग्नीकर, जी.एस. आमोणकर स्कूल, गोवा साऊथ अजय धोंड, एस.एस. समिती  आय व्ही. डी. बी. स्कूल, हिंगोली श्रुती देशमुख, केंब्रिज स्कूल ऑफ कॉमर्स, कळमनुरी, नागपुर सिटी जयश्री केकटे, आदर्श संस्कार विद्यालय, नागपूर ग्रामीण तनुश्री घुमे, विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल भिवापूर, पुणे हर्षद गाडगे, जि.प. शाळा  आळेफाटा, जळगाव कुंदन सुर्यवंशी, विवेकानंद प्रतिष्ठान, सावखेडा शिवार, सिंधुदुर्ग अथर्व वावलिये, विद्यामंदिर हायस्कूल कणकवली, लातूर समर्थ बाहेती, मारवाडी राज्यस्थान विद्यालय,  नांदेड समर्थ देशमुख, महात्मा फुले हायस्कूल, नंदुरबार सिध्दांशू वाडिले, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल नंदुरबार, परभणी अवंतिका चिबाड, जवाहर विद्यालय जिंतूर, पालघर मयुरेश दिवेकर, नॅशनल इंग्लीश प्रायमरी स्कुल विरार ई,  रत्नागिरी  भावेश सावल, जीजीपी एस इंग्लिश मीडियम स्कूल, रायगड  स्वरा वाणी, चिमणराव केळकर विद्यालय चांदोरे, सोलापूर सोहम हिरेमठ, निर्मलाताई ठोकळ प्रशाला, कोल्हापूर साईराज पाटील, जखाले हायस्कूल जखाले, सातारा सर्वेश काटकर, अनंत इंग्लिश स्कूल, ठाणे साक्षी बोंडगे, संकेत विद्यालय, वर्धा परिक्रमा राऊत न्यू इंग्लिश स्कूल, वाशिम अनिमेश जैन, शांतीनिकेतन इंग्लिश स्कूल, यवतमाळ धनश्री चिकटे शांती निकेतन स्कूल,  वणी.

टॅग्स :Lokmatलोकमत