शहरं
Join us  
Trending Stories
1
राजीनाम्यावर राजीनामे! थोड्याच वेळात नायाब सिंह सैनी राजीनामा देणार, हरियाणा विधानसभा भंग करण्याची शक्यता
2
सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला ब्रेक; शक्तीपीठनंतर आता भक्तीपीठ आणि औद्योगिक महामार्गाचं काम थांबवलं
3
Rohit Sharma Virat Kohli, IND vs BAN: "तो' खूप टॅलेंटेड आहे, पण विराट-रोहितच्या सावलीखाली लपला जातो"; स्टार समालोचकाचं मत
4
iPhone Eye Tracking Feature: जबरदस्त! आता iPhone तुमच्या डोळ्यांच्या इशाऱ्यावर चालणार;नवीन फिचर आले
5
रक्ताचे डाग, फाटलेले कपडे; पालघरमध्ये 10 वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार
6
Sandip Ghosh : "तो बलात्कारी, खुनी, चोर... त्याला फाशी द्या"; संदीप घोषला पाहताच वकिलांची जोरदार घोषणाबाजी
7
विम्यासाठी तक्रार घ्या म्हटले म्हणून संकेत बावनकुळे अडकला? सुषमा अंधारेंचा धक्कादायक दावा
8
आता २० किमीपर्यंत टोल माफ, नवा नियम; टोल नाक्यावरही पैसे कापणार नाहीत
9
शिमल्यात तणाव वाढला, संजौली मशिदीकडे निघालेल्या आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज, अनेक जखमी
10
टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन तयार करणाऱ्या बड्या कंपनीत सणासुदीपूर्वी कर्मचारी कपात, २०० जणांना काढणार
11
"राहुल गांधी हे परकीय मानसिकतेलाच धार्जिणे आहेत", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
12
टोल नाक्यावर १०० मीटरपेक्षा मोठी रांग, १० सेकंड वेटिंगचा खरोखरच नियम होता? NHAI कडे लाखो तक्रारी...
13
१२५ कोटींच्या प्रकरणात भाजपच्या मंत्र्याची मुंबई पोलिसांकडून चौकशी; कोर्टाने दिले आदेश
14
भूकंपाच्या धक्क्यांनी दिल्ली हादरली! पाकिस्तानात केंद्र, किती होती तीव्रता?
15
Gold-Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा तेजी, पाहा किती आहे १० ग्रॅम सोन्याची किंमत
16
अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांनी संपवलं जीवन; टोकाचं पाऊल उचलण्यामागे कारण काय?
17
महागड्या कार आणि आलिशान घरासह कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे 'ही' लोकप्रिय अभिनेत्री
18
"जोपर्यंत भाजप आहे, तोपर्यंत...", राहुल गांधींच्या विधानानंतर अमित शाहांची संतप्त पोस्ट
19
वडिलांच्या निधनाची माहिती मिळताच मलायका तातडीने मुंबईत परतली, एक्स बॉयफ्रेंड अर्जुन कपूरही दाखल
20
"मला अपमानास्पद वागणूक देऊ नका"; सोमय्यांच्या पत्रावर BJP चे स्पष्टीकरण, "पक्ष कोणाला..."

नवनिर्मितीतून घडतो शास्त्रज्ञ

By admin | Published: February 28, 2017 1:30 AM

विज्ञान अनुभवातून शिकण्याची गोष्ट आहे. त्यामुळे वर्गाबाहेर शिकतो ते अधिक महत्त्वाचे असते.

पुणे : ‘विज्ञान अनुभवातून शिकण्याची गोष्ट आहे. त्यामुळे वर्गाबाहेर शिकतो ते अधिक महत्त्वाचे असते. भवतालचे निरीक्षण करून शास्त्रीय ज्ञान आत्मसात करून त्यास कल्पक शक्तीची जोड दिल्यास नवनिर्मिती करणे शक्य होते. उत्सुकता, सर्जनशीलता आणि नवनिर्मिती यांतूनच शास्त्रज्ञ आणि कलाकारही घडत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या तीन गोष्टी आत्मसात कराव्यात,’ असे प्रतिपादन आयआयटी कानपूरचे माजी संचालक डॉ. संजय धांडे यांनी केले.राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून भारतीय विद्याभवन संस्थेच्या मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्राच्या वतीने आयोजित दोन दिवसीय ‘यंग एक्सप्लोरर’ या आंतरशालेय विज्ञानप्रकल्प स्पर्धेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी पुणे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार, भारतीय विद्या भवन संस्थेचे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे, विज्ञानशोधिकेचे मानद संचालक अनंत भिडे, नेहा निरगुडकर, भारती बक्षी आदी उपस्थित होते. धांडे म्हणाले, ‘शास्त्रज्ञ संशोधनातून नवनिर्मिती करतो, तर कलाकार साधनेतून कलाकृती साकारतो. शास्त्रज्ञ आणि कलाकार यांचा संगम झाला, तर अनेक नव्या गोष्टी निर्माण होतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शास्त्रज्ञ व कलाकार यांच्यातील गुण आत्मसात करून शास्त्रकार बनावे. कुणाल कुमार म्हणाले, ‘सध्या प्रत्येक क्षेत्रात इनोव्हेशनमुळे मोठे बदल घडत आहेत. समाजाचे अनेक प्रश्न सोडविण्यासाठी इनोव्हेशन महत्त्वाची भूमिका बजावीत आहे. विद्यार्थ्यांनी चौकटीबाहेरचा विचार करण्याची सवय लावली पाहिजे.’नंदकुमार काकिर्डे यांनी मनोगत व्यक्त केले. अनंत भिडे यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. या प्रदर्शनात एकूण ६९ प्रकल्प सादर करण्यात आले आहेत. यासाठी ४५ शाळांतून २५० पेक्षा अधिक प्रकल्प आले होते. ज्युनिअर व सिनिअर गटात ही स्पर्धा आयोजिली आहे. पुणे पोलीस पब्लिक स्कूल आणि चंद्रकांत दरोडे विद्यालय या दोन महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांनीही या स्पर्धेत भाग घेतला आहे. स्मार्ट सिटी, स्टेप क्लायंबिग बास्केट, मल्टिपर्पज सेफ्टी फॅन, मोड्यूलोपेंडुलम असे विविध प्रकारचे प्रकल्प इथे विज्ञानप्रेमींना मोफत पाहता येणार आहेत. रश्मी बहुलकर व स्नेहलता शेलार यांनी या प्रकल्पाचे संयोजन केले आहे.<प्रश्नमंजूषा स्पर्धेत ‘ब्लू रिज’ शाळेला प्रथम क्रमांकविज्ञानशोधिकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्रश्नमंजूषा स्पर्धेत ब्लू रिज शाळेला प्रथम क्रमांक मिळाला. हर्ष पाटील, अखिलेश खांबेकर आणि आयुष मंचालवार या विद्यार्थ्यांच्या गटाने बाजी मारली. सिम्बायोसिस स्कुलने द्वितीय तर, कल्याणीनगर येथील बिशप स्कुलच्या विद्यार्थ्यांनी तिसरा क्रमांक मिळवला. ३० शाळेतून ५६ प्रवेशिका आल्या होत्या. लीप अँड स्केलच्या प्रशांत जोशी यांनी प्रश्नमंजुषा स्पधेर्चे संचलन केले.