सिवनी : पेंच व्यवस्थापन नाला क्षेत्रात २८ मार्च रोजी एक वाघीण मृतावस्थेत आढळल्यानंतर मंगळवारी तिचे दोन बछडे त्याच भागात मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. वाघीण आणि बछड्यांचा मृत्यू विषामुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.मृत वाघीण १२ वर्षांची होती. वाघीण आणि तिच्या बछड्यांचे शवविच्छेदन केल्यानंतर विषामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या वाघिणीचा मृतदेह सोमवारी सायंकाळी कर्माझरी रेंज सतोषा बीटच्या कम्पार्टमेंटमधील पेट्रोलिंग कॅम्पजवळ आढळला होता. त्यानंतर तिच्या बछड्यांचा शोध घेतला जात होता. मंगळवारी दुपारी तिचे दोन बछडे याच भागात मृतावस्थेत आढळले. विषयुक्त पाणी प्याल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. वाघिणीचा तिसरा बछडा वाघीण नाला भागात फिरताना दिसला तर चौथा बछडा अद्याप सापडलेला नाही. पार्कमध्ये संशयित शिकाऱ्यांचाही शोध घेण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
पेंचमध्ये वाघीण, बछडे मृतावस्थेत
By admin | Published: March 30, 2016 12:45 AM