शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

जुन्या नाटकांच्या संहिता ई-लायब्ररीद्वारे उपलब्ध होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 1:09 PM

आता प्रादेशिकसह इतर भाषिक दिग्दर्शकांची ही अडचण दूर होणार आहे.

ठळक मुद्देदिग्दर्शकांची झाली सोय : मुंबईच्या बीइंग असोसिएशनचा पुढाकार आजमितीला संस्था तब्बल तीनशे हिंदी नाटकांचा संग्रह करण्यात यशस्वी

- नम्रता फडणीस- पुणे : मराठी, हिंदी, इंग्रजी अशा तिन्ही रंगभूमीवर अनेक दर्जेदार नाटकांचे सादरीकरण होते; पण एखाद्या दिग्दर्शकाला इंग्रजीमधील नाटक मराठीत आणायचे असेल किंवा हिंदीमध्ये ते सादर करायची इच्छा असेल, तर त्या नाटकाच्या ‘संहिता’  मिळणार कुठं, हाच मोठा प्रश्न असतो; पण आता प्रादेशिकसह इतर भाषिक दिग्दर्शकांची ही अडचण दूर होणार आहे. बीइंग असोसिएशन, मुंबई या संस्थेतर्फे हिंदी रंगभूमीवरील दर्जेदार नाटकांबरोबरच जुन्या नाटकांच्या निवडक संहिता ‘ई-लायब्ररी’च्या माध्यमातून दिग्दर्शकांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आजमितीला संस्था तब्बल तीनशे हिंदी नाटकांचा संग्रह करण्यात यशस्वी ठरली आहे. मुंबईची बीइंग असोसिएशन ही संस्था २०१७ पासून दर वर्षी राष्ट्रीय स्तरावर ‘संहितामंच’ या नाट्यलेखन स्पर्धेचे आयोजन करते. या स्पर्धेद्वारे संस्थेमार्फत देशभरातून स्वलिखित नाटके मागवली जातात आणि नाट्य क्षेत्रातील तज्ज्ञ, दिग्गज मंडळी या सर्व नाटकांमधून तीन सर्वश्रेष्ठ नाटके निवडतात. विशेष म्हणजे, ही निवड झालेली नाटके संस्था पुस्तकरुपात प्रकाशित करून, तरुण दिग्दर्शकांकडून ती दिग्दर्शित देखील केली जातात. वेगवेगळ्या शहरात या नाटकांचा महोत्सव भरविला जातो. या अभिनव उपक्रमाबद्दल बीइंग असोसिएशनच्या दिग्दर्शिका रसिका आगाशे ‘लोकमत’ शी बोलताना म्हणाल्या की, आम्हाला दर वर्षी हिंदी रंगभूमीसाठी एक वेगळं नाटक हवं असतं. दोन वर्षांपूर्वी शोध घेऊनही ते काही केल्या मिळत नव्हतं.  कुणी नाटकचं लिहीत नाहीये  का, असं आम्हाला वाटलं. मग यासाठी  ‘स्पर्धा’ घेण्याचं ठरवलं आणि त्या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. हे पाहिल्यानंतर कुणी लिहीत नाहीये का? तर असं नाही. फक्त त्यांना व्यासपीठ मिळत नाहीये हे जाणवलं.  समांतर रंगभूमीसाठी कोणं कोणं काम करतयं याची माहिती देखील प्रादेशिक भाषांमधील कलाकारांना नसते. प्रत्येक जण आपापली  नाटकं करण्यात मग्न असतो. ही स्पर्धा आयोजित केल्यानं मलाही दर वर्षी जे नवीन नाटक करायचं होतं ते  करायला मिळालं आणि माझ्या मित्रांनाही यामध्ये जोडून घेतलं. यामुळे वेगवेगळ्या लेखकांची नाटकं वेगवेगळया दिग्दर्शकांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली.  ......संस्थेकडे हिंदी नाटकांच्या ३०० संहितासंस्थेकडे हिंदी नाटकांच्या तीनशे संहिता उपलब्ध आहेत. त्यातील निवडक संहिता ‘ई-लायब्ररी’ माध्यमातून ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यातच जुन्या संहितादेखील वाचायला मिळत नाहीत आणि त्या पुनर्प्रकाशितदेखील केल्या जात नाहीत. 

यासाठी आम्ही १५० जुन्या नाटकांच्या संहिता जमा केल्या आहेत. त्यादेखील ऑनलाइन पाहता येणार आहेत. हळूहळू सर्व भाषांमधील लेखकांशी बोलून त्यांच्या संहिता उपलब्ध करून दिल्या जातील. संस्थेकडून लेखकांना मानधन दिले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्या त्या शहरात जाऊन नाटककारांशी बोलून त्यांचे डॉक्युमेंटेशनही आम्ही करीत असल्याचे त्या म्हणाल्या.  ........

टॅग्स :PuneपुणेTheatreनाटकdigitalडिजिटल