शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडक्या बहिणींना २१०० रुपये, २५ लाख नवीन नोकऱ्या...; भाजपच्या संकल्प पत्रात काय-काय?
2
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, पवारांचंही नाव घेतलं!
3
"मग मी पण बघतो तुम्ही आमदार कसे काय राहता", अजित पवारांचं रामराजेंना आव्हान
4
परशुराम घाटात पुन्हा भीषण अपघात, एसटी चालकासह एक प्रवासी जखमी, वाहतूक ठप्प
5
धक्कादायक! २५ मुलींना जाळ्यात अडकवलं, लाखो रुपये उकळले; बनावट IRS चा झाला पर्दाफाश
6
"राहुल गांधींनी आपल्या वडिलांना आणले, तरी...", प्रचार सभेत मुख्यमंत्र्यांची जीभ घसरली
7
"बापाचा विषयच नाही इथे, तुमचे काकाच..."; जयंत पाटलांचा अजित पवारांवर 'वार'
8
"अरे माझ्या सभेत गुंड प्रवृत्तीचे लोक पाठवून धिंगाणा काय करता? ताईंनो..."; आमदार बंब विरोधकांवर जाम भडकले
9
पान मसालाच्या जाहिरातीवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर अजय देवगणची प्रतिक्रिया, म्हणाला...
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना अनुकूल, धनलाभ; उत्तम यश-प्रगती, विठ्ठल-रखुमाई शुभच करतील!
11
ग्रेटर नोएडा एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
12
महिलांची व्यवस्था करतो ही कसली भाषा? धनंजय महाडिकांना प्रणिती शिंदेंचा संतप्त सवाल 
13
"...तर राजीनामा देऊन त्यांचा कार्यकर्ता होईन"; आमदार प्रशांत बंब यांचं चॅलेंज सतीश चव्हाण स्वीकारणार?
14
कोलकाता डॉक्टर हत्या प्रकरण: ज्युनियर डॉक्टरांचं आंदोलन; ममता सरकारवर गंभीर आरोप
15
वयाच्या ८० व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते गणेश यांचं निधन, ४०० हून अधिक सिनेमांमध्ये केलेलं काम
16
'सिंघम अगेन'मधील सलमान खानच्या कॅमिओवर रोहित शेट्टी म्हणाला, "त्याच्या सुरक्षेमुळे..."
17
भाजपा आमदाराच्या भावाची घरात घुसून बेदम मारहाण करून हत्या; नातीच्या अपहरणाचा प्रयत्न
18
'आंबेडकर जिंदा हैं तो गोडसे मुर्दा है'; पंतप्रधान मोदींच्या 'एक हैं तो सेफ हैं'वर काय म्हणाले ओवेसी?
19
राम चरणचा 'लय भारी' अंदाज अन् जोडीला कियारा अडवाणी! 'गेम चेंजर'चा हटके टीझर रिलीज
20
"पराभूत झाल्या तर मुलांचा सांभाळ करतील, याचा फायदा...", भाजप नेत्याचे RLP खासदाराच्या पत्नीबाबत विधान

सांगलीच्या शिल्पकाराचे शिल्प ‘युनो’मध्ये विराजमान

By admin | Published: April 19, 2016 7:42 PM

सांगली जिल्ह्यातील कडेगावचे शिल्पकार चंद्रजित यादव यांनी तयार केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याचे लवकरच अमेरिकेतील संयुक्त राष्ट्रसंघात (युनो)

सांगली : सांगली जिल्ह्यातील कडेगावचे शिल्पकार चंद्रजित यादव यांनी तयार केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याचे लवकरच अमेरिकेतील संयुक्त राष्ट्रसंघात (युनो) अनावरण होणार आहे. दि. १४ एप्रिलला डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीवेळी याच शिल्पाची युनोच्या मुख्यालयात मिरवणूकही काढण्यात आली. केवळ बारा दिवसात तयार केलेल्या या सुंदर शिल्पामुळे यादव यांच्या कलेची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती जगभर साजरी करण्यात आली. १७० देशांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या युनोमध्येही त्यांना अभिवादन करण्यात आले. मात्र याच युनोमध्ये अनावरण होत असलेले आणि जयंतीदिनी तिथे मिरवणूक काढण्यात आलेले डॉ. आंबेडकरांचे शिल्प मूळच्या कडेगावच्या, पण सध्या मुंबईत वास्तव्यास असलेल्या चंद्रजित यादव यांनी बनविलेले आहे, याची कल्पना कोणालाच नव्हती!यादव येथील कलाविश्व महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी. ते महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष असून, त्यांनी केवळ बारा दिवसात हे शिल्प तयार केले आहे. १७० देश सदस्य असलेल्या युनोमध्ये अजूनही भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व नाही. मात्र तेथील एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी युनोमध्ये डॉ. आंबेडकरांची जयंती साजरी करण्याचा प्रस्ताव मांडला होता. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असलेल्या आंबेडकरांचे शिल्प युनोमध्ये असावे, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली होती. त्यास परवानगी मिळाल्यानंतर हा पुतळा देण्याची जबाबदारी मुंबईतील कल्पना सरोज फाऊंडेशनने उचलली होती. हे शिल्प तयार करण्यासाठी चंद्रजित यादव यांचे नाव माजी आयुक्त आर. डी. शिंदे यांनी या फाऊंडेशनला सुचविले. या प्रस्तावानुसार अर्धपुतळा तयार करण्यासाठी केवळ बारा ते तेरा दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. मात्र, इतक्या कमी वेळात यादव यांनी अत्यंत सुबक आणि आकर्षक पुतळा तयार केला आहे. विटा येथील व औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळाही यादव यांनीच तयार केला आहे. आता कोकणातील लोणेरे तंत्रशिक्षण विद्यापीठासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा १४ फुटी पुतळा तयार करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)डॉ. आंबेडकरांचे व्यक्तिमत्त्व शिल्पातून मांडणार अत्यंत बुध्दिमान आणि ज्ञानाचा प्रचंड खजिना असलेल्या या व्यक्तिमत्त्वाचे शिल्प एकाच पठडीत असल्याचे दिसून येते. मात्र, आंबेडकरी जनतेने जर बदल स्वीकारले, तर डॉ. आंबेडकरांना शिल्पाच्या माध्यमातून वेगवेगळ्या रूपात दाखविण्याचा प्रयत्न असल्याचेही चंद्रजित यादव यांनी सांगितले. आंबेडकरांचे राहणीमान स्वच्छ, निर्मळ आणि उच्चकोटीचे असल्याने त्यांना या रूपातही मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब उतरविण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.असामान्य बुध्दिमत्तेने जगावर छाप पाडणाऱ्या आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असलेल्या डॉ. आंबेडकर यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे शिल्प बनविणे, हे मी माझे भाग्य समजतो. युनोचे सदस्यत्वही अजून आपल्याला मिळाले नसताना, मी तयार केलेले शिल्प तेथे विराजमान झाले, ही अभिमानास्पद गोष्ट आहे. डॉ. आंबेडकरांचे उच्चकोटीचे व्यक्तिमत्त्व शिल्पाच्या माध्यमातून उतरविण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील आहे. - चंद्रजित यादव, शिल्पकार