शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या राज्यातील १३ पेट्रोल पंपांना सील

By admin | Published: June 22, 2017 5:21 AM

कमी पेट्रोल देऊन ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या राज्यभरातील १३ पेट्रोल पंपांना आतापर्यंत ठाणे पोलिसांनी सील ठोकले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कमी पेट्रोल देऊन ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या राज्यभरातील १३ पेट्रोल पंपांना आतापर्यंत ठाणे पोलिसांनी सील ठोकले आहे. या कारवाईतील आरोपींची संख्या सातवर पोहोचली असून, कारवाईचा धडाका अद्यापही सुरुच आहे.कमी पेट्रोल देऊन वाहनधारकांची फसवणूक करणाऱ्या पेट्रोल पंपांविरूद्ध ठाणे पोलिसांनी शुक्रवारी रात्रीपासून कारवाईची मोहीम सुरु केली. या कारवाईअंतर्गत आतापर्यंत १३ पेट्रोल पंपांना सील ठोकण्यात आले. यामध्ये शहापूर नजिकचे खर्डी भिवंडी आणि कल्याणमधील पेट्रोलपंपांचाही समावेश आहे. वजन व मापे निरीक्षण विभाग आणि पेट्रोलियम कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत सुरु असलेल्या या कारवाईमध्ये पेट्रोल पंपांची तपासणी सुरु आहे. वाहनांमध्ये इंधन भरण्यासाठी असलेल्या सर्व मशिन्सची तपासणी केली जात असून, ज्या मशिनमध्ये हेराफेरी केल्याचे दिसत आहे, केवळ त्याच मशिनला सील ठोकले जात असल्याचे गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक आयुक्त मुकुंद हातोटे यांनी सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री उशिरापर्यंत आणखी काही पेट्रोल पंपांवर पोलिसांची कारवाई सुरु होती. त्यामुळे सील ठोकलेल्या पेट्रोल पंपांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.पुरवठामंत्र्यांची भेटपेट्रोल डिझेल असोसिएशनच्या शिष्टमंडळाने बुधवारी अन्न व नागरीपुरवठा मंत्री गिरीश बापट यांची भेट घेऊन पोलिसांच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली. बदलापूर आणि शीळफाटा येथील पंपांवर पोलिसांनी कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप यावेळी संघटनेने केली. पोलिसांच्या कारवाईमुळे कर्मचाऱ्यांमध्ये दहशत पसरली असून, ते कामावर येत नसल्याने इंधन वाट बंद पडण्याची भिती त्यांनी व्यक्त केली. पेट्रोल पंपावरील ज्या मशीनमध्ये हेराफेरी असेल केवळ तीच मशीन सील करण्याऐवजी सर्व मशीन्सला सील ठोकले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रभात सिंग, उपाध्यक्ष राजू मुंदडा, सचिव केऊर पारेख आदी उपस्थित होते.