शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

जगातील सर्वाधिक आनंदी लोकांचा देश नावलौकिक असलेल्या 'फिनलँड'लाही कोरोनाची झळ ; 'हेलसिंकी' भाग सील

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2020 5:28 PM

उर्वरित फिनलँंडमध्ये तुलनेने कमी बाधित, २७ जणांचा मृत्यू

ठळक मुद्देकोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे येथील सरकारने फिनलँडमधून बाहेर जाणे व बाहेरून येणे बंदभारताप्रमाणे कोरोनाच्या चाचण्या करण्याची क्षमता कमी असल्याने सरसकट चाचण्या

अभय नरहर जोशी - पुणे :जगातील सर्वाधिक आनंदी लोकांचा देश म्हणून फिनलँड या देशाची ओळख आहे. सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या साथीची झळ याही देशाला बसली असली, तरी येथील परिस्थिती अद्याप नियंत्रणात आहे. ६ एप्रिलअखेरपर्यंत या देशात ३२ हजार ८०० जणांच्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत. दोन हजार १७६ जण कोरोनाबाधित झाले आहेत. २७ जण या साथीत मृत्युमुखी पडले आहेत. हेलसिंकी हे राजधानीचे शहर असलेल्या उसिमा जिल्ह्यात एक हजार ३६२ जण कोरोनाबाधित आहेत.  फिनलँडच्या इतर भागात फारच कमी प्रादुर्भाव आहे. येथे सध्या कामानिमित्त गेलेल्या मूळचे पुणेकर श्रीनाथ केसकर यांनी ' लोकमत'शी संवाद साधताना या देशातील कोरोना संदर्भातील आपली निरीक्षणे नोंदवली. फिनलँड हा उत्तर युरोपातील स्कँडिनेव्हियातील एक देश आहे. फिनलँडच्या पश्चिमेला स्वीडन, उत्तरेला नॉर्वे, पूवेर्ला रशिया तर दक्षिणेला फिनलंडचे आखात आहे. हेलसिंकी ही फिनलंडची राजधानीचे व सर्वात मोठे शहर आहे. केसकर यांनी सांगितले, की फिनलँडवासीय अतिलोकशाहीवादी असल्याने सरकारला अचानक बंदी करता येत नाही. तरीही कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे येथील सरकारने फिनलँडमधून बाहेर जाणे व बाहेरून येणे बंद केले. या लॉकडाऊनच्या काळात तुमच्याकडे योग्य कारण असेल तरच परवानगी मिळते. हा निर्णय १६ एप्रिलपर्यंत लागू करण्यात आला आहे. साधारण १२ दिवस विचार, चर्चा केल्यानंतर येथील सरकारने २८ मार्चपासून उसिमा जिल्हा म्हणजे हेलसिंकी परिसर आयसोलेट म्हणजेच सील केला आहे.केसकर यांनी सांगितले, की येथेही भारताप्रमाणे कोरोनाच्या चाचण्या करण्याची क्षमता कमी असल्याने सरसकट चाचण्या केल्या जात नाहीत. सरकारने कॉटेजचा उपयोग विलगीकरणासाठी केला आहे. त्यासाठी मोठी रिकामी अपार्टमेंट वापरली जात आहेत. येथील सर्व प्रमुख मार्गांवर पोलीस आहेत. आता इथे उन्हाळा सुरु झाला. रात्री आठपर्यंत चांगला प्रकाश असतो. माज्या माहितीतील कुटुंबाने रात्री अकरानंतर घर शिफ्ट केले. ह्यलॉकडाऊनह्णमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होत आहे. त्यामुळे येथील दुकानांत गर्दी कमी झाली. सर्व हॉटेल, बार, क्लब बंद आहेत. सुपर मार्केट, मॉलमध्ये सर्व वस्तू मिळतात. मात्र सॅनेटायझर व मास्क मिळत नाहीत. ते शोधावे लागतात. येथील सरकारने भारतात अडकलेल्या फिनिश नागरिक परत आणले आहे. गोवा व मुंबई येथून दोन खास विमाने पाठवली. भारताप्रमाणेच येथेही काही मूर्ख लोक ह्यलॉकडाऊनह्णला न जुमानता काही बाहेर फिरत असतात. पण बाकी बरेच लोक चांगली काळजी घेत आहे. गॉगल घालत आहेत. एकमेकापासून दूर राहतात. सगळ्यात वाईट म्हणजे येथे आता कामगार कपात सुरू झाली आहे.एचसीएल हा येथील पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे. येथील रहिवासी ह्यएचसीएलह्णचा एक-दोन किंवा ३ महिन्यांचा सीझन पास काढतात. हा पास बस, ट्राम, मेट्रो, रेल्वे सगळीकडे चालतो. येथे सध्या पब्लिक ट्रान्सपोर्ट सुरू असले तरी लोक फारच कमी प्रवास करत आहे. त्यामुळे एचसीएलने ज्या लोकांनी सीझन पास काढले आहेत त्यांनी न वापरलेली रक्कम परत करणे सुरू केल्याची माहितीही केसकर यांनी दिली.-------------------इमारती केल्या निळ्या रंगाने प्रकाशित!हेलसिंकी येथील फिनलँडिया हॉलसारख्या महत्वाच्या इमारती निळ्या रंगाने प्रकाशित केल्या आहेत. कोरोना साथ हटवण्यासाठी आणि रुग्णसेवेसाठी झटणा?्या आरोग्य कर्मचारी आणि इतर सहाय्यक कर्मचा?्यांना अभिवादन म्हणून तसे करण्यात आले आहे. डॉक्टर, नर्स व इतर आरोग्य कर्मचाºयांसह अन्न वितरण करणारे कर्मचारी, वाहनचालक, या मोहिमेत सहभागी शिक्षक, स्वच्छता कर्मचारी या सर्वांना याद्वारे अभिवादन करण्यात आले.- श्रीनाथ केसकर, हेलसिंकी, फिनलँड  

 

टॅग्स :PuneपुणेfinlandफिनलंडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यू