-अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: सार्वजनिक धान्य वितरण प्रणालीतील अनियमिता आणि गळती रोखण्यासाठी राज्य शासनाकडून कडक अंमलबजावणी केली जात आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्र राज्यात १ फेब्रुवारी ते ३० एप्रिल २०२१ या कालावधीत अपात्र शिधापत्रिकांचा शोध घेण्यासाठी तब्बल २५ कोटी शिधापत्रिकांची विशेष तपासणी मोहिम राबविण्यात येणार आहे. राज्य शासनाकडून बीपीएल, अंत्योदय, अन्नपूर्णा, केसरी, शुभ्र व आस्थापना कार्ड यावर्गवारीमध्ये तब्बल २४ कोटी ७ लक्ष ४१ हजार ७६४ शिधापत्रिका वितरीत केल्या आहेत. या सर्वच शिधापत्रिकांची कोटकोरपणे तपासणी केली जाणार असून, त्यासाठी शासकीय कर्मचारी/ तलाठी यांची मदत घेतली जाणार आहे. त्याचप्रमाणे तपासणीअंती शिधापत्रिकांची दोन गटात विभागणी केली जाईल. यामध्ये छाननीनंतर पुरेसा पुरावा असलेल्यांची यादी ‘गट-अ’ म्हणून केली जाईल. तर ‘गट-ब’ मध्ये पुरेसा पुरावा न देणाºयांची नोंद घेतली जाणार आहे. सुमारे दोन महिने चालणाºया या शोध मोहिमेत केंद्र शासनाकडून प्राप्त प्रत्येक निर्देशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय २८ जानेवारी रोजी राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे.