शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
2
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
3
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : येवल्यातील गावात भुजबळांना मतदान केंद्रावर जाताना अडवले; शाब्दीक चकमक
4
“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
6
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
7
VIDEO : परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला मुंडे समर्थकांची मारहाण; राष्ट्रवादीकडून निषेध...
8
जीवघेणं रॅगिंग! सीनियर्सनी अनेक तास उभं राहण्याची दिली शिक्षा; विद्यार्थ्याचा झाला मृत्यू
9
घसरणीचा झुनझुनवाला कुटुंबालाही फटका; २ महिन्यात १५००० कोटी गमावले; हा शेअर सर्वात जास्त पडला
10
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
11
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
12
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
13
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
14
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
15
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
16
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
17
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
18
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
19
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
20
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'

गुप्त वार्ता विभागाला चाणाक्ष अधिकाऱ्यांचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 7:05 AM

राज्य गुप्त वार्ता विभागात सहायक गुप्तवार्ता अधिकारी गट-क या दर्जाची तब्बल २०४ पदे भरण्यात येणार आहेत

जमीर काझीमुंबई : राज्य गुप्त वार्ता विभागात सहायक गुप्तवार्ता अधिकारी गट-क या दर्जाची तब्बल २०४ पदे भरण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, ही सर्व पदे मुंबई विभागातील आहेत. त्यासाठी सुशिक्षित तरुणांना आॅनलाइन अर्ज करावे लागणार आहेत. यासाठी १२ जूनपर्यंत मुदत आहे.देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई हे शहर नेहमीच अतिरेक्यांच्या ‘टार्गेट’वर राहिले आहे. रोज नागरिकांचे हजारो लोंढे उदरनिर्वाहानिमित्त मुंबईत येतात. महानगराची लोकसंख्या दीड कोटींवर पोहोचली आहे. त्या तुलनेत दहशतवादी संघटना, राजकीय, सामाजिक संघटना, कार्यकर्ते यांच्यावर नजर ठेवून गुप्त माहिती मिळविण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ तोकडे पडत आहे. त्यामुुळे या ठिकाणी सहायक अधिकाºयांची आवश्यकता असल्याने, आयुक्त संजय बर्वे यांनी मुंबई विभागांतर्गत सहायक अधिकारी गट-क या दर्जाची २०६ पदे भरण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविला होता. त्याला हिरवा कंदील मिळाला आहे.या पदासाठी महापरीक्षा पोर्टलमार्फत स्पर्धात्मक परीक्षेसाठी आॅनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक असून, खुल्या गटासाठी ३० वर्षे व मागास उमेदवारासाठी ३३ वर्षे इतकी वयोमर्यादा आहे. महाराष्टÑ राज्य सरकारच्या संकेतस्थळावर या पदाच्या भरतीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.यापूर्वी ८२ पदांची भरतीथेट सहायक गुप्त वार्ता अधिकारी वर्ग-२ ची (एसआयओ) २००९ मध्ये ८२ पदे भरण्यात आली होती. त्यापैकी सध्या ५८ जण विभागात कार्यरत आहेत. उर्वरित अधिकारी राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून परीक्षा देऊन उपअधीक्षक, उत्पादन शुल्क अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार बनले आहेत.प्रधान समितीचा अहवालमुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर गुप्त वार्ता विभागाचा फोलपणा चव्हाट्यावर आला होता. विशेषत: ‘ग्राउंड लेव्हल’ला माहिती मिळविणारी यंत्रणा व सक्षम अधिकारी नसल्याचे ताशेरे हल्ल्याच्या चौकशीबाबत नेमलेल्या प्रधान समितीने अहवालात ओढले होते. त्यामुळे विभागाकडून गेल्या नऊ वर्षांत सहायक अधिकारी गट-क या पदाची तीन वेळा भरती करण्यात आली आहे.अशी होणार भरतीसहायक गुप्त वार्ता अधिकाºयासाठी उमेदवार पदवीधर असणे आवश्यक असून, पुरुषांसाठी १६५ सेमी तर महिलांसाठी १५५ सेमी उंची असणे आवश्यक आहे. एकूण २०४ पदांपैकी ९८ पदे ही खुल्या गटासाठी असून, उर्वरित १०६ पदे विविध प्रवर्गातून भरण्यात येणार आहेत. आॅनलाइन अर्ज केलेल्या इच्छुक उमेदवारातून पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. त्यातून गुणवत्ता यादी निश्चित करून मुलाखतीनंतर अंतिम निवड यादी जाहीरकेली जाईल. या परीक्षेबाबतची माहिती उमेदवाराला ई-मेल करून दिली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांकडून तीन वर्षांचा बाँड लिहून घेतला जाणार आहे. या कालावधीत त्यांनी राजीनामा दिल्यास व्यवसायिक प्रशिक्षणाचा सर्व खर्च, त्या काळातील वेतन भरून घेतला जाणार आहे.