शहरं
Join us  
Trending Stories
1
“विधानसभेलाही मराठवाड्यात मनोज जरांगेंचा इफेक्ट दिसेल, मविआ उमेदवार जिंकतील”: बजरंग सोनावणे
2
मोठी घडामोड! पन्नूच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्याला भारताने केली अटक; अमेरिकेलाही कळविले
3
अपंगत्वाच्या आधारावर MBBS मध्ये प्रवेश रोखता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
4
'मतदार योग्य उत्तर देतील...', EVM वर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर निवडणूक आयुक्तांची टीका
5
सावधान! गर्लफ्रेंडची कॉल हिस्ट्री, चॅट्स पाहताय? बॉयफ्रेंडची अशी होतेय फसवणूक...
6
कॅनडामध्ये RSSवर बंदी घाला, विरोधी पक्षाच्या नेत्याने केली मागणी 
7
अमिताभ बच्चन यांच्याकडे आहेत 'या' कंपनीचे २९८५४५ शेअर्स; आता ₹४१ वरून ₹६७७ वर पोहोचली किंमत
8
अश्विनबद्दल हे काय बोलून गेला पाकिस्तानचा रमीझ राजा... Video पाहून भारतीयांना नक्कीच येईल राग
9
आणखी एका काँग्रेस आमदाराची पक्षातून हकालपट्टी; पक्षविरोधी कामे केल्याचा ठपका 
10
बहुजन विकास आघाडी पालघर जिल्ह्यातील ६ जागा लढवणार, कोअर कमिटीत निर्णय
11
डिजिटल इंडियामुळे भारत बदलला, लवकरच 6G सेवेवर काम करणार - नरेंद्र मोदी
12
Babar Azam नं दिली नव्हती किंमत; आता त्याचीच जागा घेत Kamran Ghulam नं दाखवली हिंमत
13
“तुमची वाट लावल्याशिवाय सोडणार नाही, फडवणीसांनी मराठ्यांकडे दुर्लक्ष करू नये”: मनोज जरांगे
14
१० दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली होती भेट; आज भाजपानं आमदार बनवलं
15
Gold Silver Price Today : 'ऑल टाईम हाय'नंतर आज सोन्या-चांदीच्या घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
16
स्पृहा जोशीचे आई वडील रुग्णालयात, फोटो शेअर करत म्हणाली, "इतकी माणसं जोडलेली असणं..."
17
लाडक्या बहिणीचा पैसा बाजारात खुळखुळणार; आजवर मन मारून राहिली... काय काय प्लॅन केलाय?
18
"सॉरी, आय लव्ह माय इंडिया"; चोराने SUV चोरली, ३ नोट्स चिटकवून कार रस्त्यातच सोडली अन्...
19
"निवडणुकीपूर्वी मोफत दिल्या जाणाऱ्या योजना म्हणजे लाच"; सुप्रीम कोर्टाची सरकारला नोटीस
20
बड्या बड्या बाता आणि...! भारताचे वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात; जाणून घ्या कारणे, चाहते संतप्त

महाविकास आघाडीचं जागावाटप ठरलं; 'असा' आहे संभाव्य फॉर्म्युला, सपा-शेकापला किती जागा?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 1:12 PM

लोकसभेत महाराष्ट्रात काँग्रेसनं सर्वाधिक १३ जागा जिंकल्या. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. 

मुंबई - राज्यातील विधानसभा निवडणुकीची कुठल्याही क्षणी घोषणा होऊ शकते. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी तयारी केली आहे. राज्यात महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढाई पाहायला मिळणार आहे. त्यात दोन्ही आघाड्यांमधील जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप समोर आला नाही. महाविकास आघाडीत जवळपास ८० टक्के जागावाटप निश्चित झालं असल्याची चर्चा होती. त्यानंतर आता महाविकास आघाडीत कोण किती जागा लढवणार याबाबत आकडे समोर आले आहेत. महाविकास आघाडीचे प्रमुख नेते पत्रकार परिषद घेत जागावाटपाबाबत अधिकृत घोषणा करतील.

दिल्लीतील सूत्रांच्या हवाल्याने महाविकास आघाडीतील जागावाटप पूर्ण झालं असून विदर्भ आणि मुंबईतील काही जागांवरून पेच आहेत. लवकरच ते सोडवले जातील असं सांगण्यात येते. महाविकास आघाडीत काँग्रेस ११९, शिवसेना ठाकरे गट ८६ आणि शरद पवारांची राष्ट्रवादी ७५ जागा, शेकाप ३, समाजवादी पक्ष २ आणि माकप २ जागा दिल्या जातील. जागावाटपाचा हा संभाव्य फॉर्म्युला समोर आला आहे. एबीपी माझानं दिल्लीतील काँग्रेसच्या उच्चपदस्थ वर्तुळातील सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी देण्यात आली आहे.

आतापर्यंत २२२ जागांवर एकमत झालं असून त्यात मुंबईतल्या १३ जागा ठाकरे गटाला, ८ जागा काँग्रेस, १ समाजवादी पार्टीला देण्याबाबत सहमती झाली आहे. अद्याप मुंबईतल्या ४ जागांवर तिन्ही प्रमुख पक्षात रस्सीखेच आहे. त्यात संभाव्य जागांमध्ये उमेदवारांची अदलाबदली होण्याची शक्यता आहे. भाजपाविरोधात एकत्रित निवडणुकीला सामोरे जायचे यावर तिन्ही पक्षांचं एकमत आहे. अनेक मुस्लीम बहुल जागांवर काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने दावा केला आहे. 

हरयाणातील निकालानंतर काँग्रेस सावध

हरयाणात काँग्रेसची सत्ता येणार असा सर्वच विरोधक दावा करत होते, मात्र प्रत्यक्षात भाजपाने याठिकाणी सलग तिसऱ्यांदा सत्तास्थापन केली. त्यानंतर मित्रपक्षांनी काँग्रेसच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उभे केले. हरयाणा निकालानंतर आता काँग्रेस नेतृत्वाने सावध भूमिका घेत महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची बैठक घेत रणनीती आखली आहे. त्यात जागावाटपावरून वाद टाळा, मुख्यमंत्रि‍पदावरून पक्षात गटबाजी नको. मविआतील वादग्रस्त मुद्द्यावर चर्चा नको अशा सूचना नेत्यांना हायकमांडने दिल्या आहेत. लोकसभेत महाराष्ट्रात काँग्रेसनं सर्वाधिक १३ जागा जिंकल्या. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे.  

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारBJPभाजपाmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४