Maharashtra Assembly Election : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे विधानसभा निवडणुकीसाठी दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या आधी शरद पवार गटाने ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर आता दुसऱ्या यादीमध्ये एकूण २२ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. या यादीमधून बीडमधील सस्पेन्स संपला असून येथून संदीप क्षीरसागर यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. इतर उमेदवारांची नावे आज रात्री किंवा उद्या जाहीर करण्यात येणार असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटलं. आमच्यातील सर्वोत्तम आणि जास्तीत जास्त मतदान घेऊन निवडून येतील असा उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.
दुसऱ्या यादीमध्ये,बीडमधून संदीप क्षीरसागर यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तर अकोल्यामधून अमित भांगरे, एरंडोलमधून सतिश पाटीलस गंगापूरमधून सतिश चव्हाण, पार्वतीमधून अश्विनी कदम, माळशिरस येथून उत्तम जाणकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर शरद पवार गटाने छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघातही उमेदवार दिला आहे. येवला मतदारसंघातून माणिकराव शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
२२ उमेदवारांची नावे
एरंडोल -सतीश अण्णा पाटीलगंगापूर - सतीश चव्हाणशहापूर - पांडुरंग बरोरापरांडा - राहुल मोटेबीड - संदीप क्षीरसागरआर्वी - मयुरा काळेबागलाण - दीपिका चव्हाणयेवला - माणिकराव शिंदेसिन्नर - उदय सांगळेदिंडोरी - सुनीता चारुसकरनाशिक पूर्व - गणेश गीतेउल्हासनगर - ओमी कलाणीजुन्नर - सत्यशील शेरकरपिंपरी - सुलक्षणा शिलवंतखडकवासला - सचिन दोडकेपर्वती - अश्विनी कदमअकोले - अमित भांगरेअहिल्यानगर शहर - अभिषेक कळंबकरमाळशिरस - उत्तम जानकरफलटण - दीपक चव्हाणचंदगड - नंदिनी बाभुळकर- कुपेकरइचलकरंजी - मदन कारंडे