मुंबई : अकरावी प्रवेशाचा पहिला अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना १२ तारखेपासून अर्जाचा दुसरा टप्पा भरता येणार आहे. यासंबंधी मार्गदर्शक सूचना आणि वेळापत्रक शिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आले आहे. विद्यार्थी आपल्या पसंतीच्या महाविद्यालयांची नोंद करू शकणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही नोंदणी केली नाही असे विद्यार्थीही यादरम्यान नोंदणी करून अकरावी प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करू शकणार आहेत. ही प्रक्रिया २२ आॅगस्टच्या रात्री ११ पर्यंत सुरू राहणार आहे.मुंबई विभागामधून आतापर्यंत २ लाख ५१ हजार ३५९ विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. यंदा कोटांतर्गत प्रवेश उच्च माध्यमिक विद्यालय स्तरावरून केले जाणार असून त्यातही शून्य फेरीचे आयोजन अकरावी आॅनलाइन प्रवेश यंत्रणेकडून करण्यात येणार आहे. शून्य फेरीनंतर नियमित ३ फेऱ्यांचे आयोजन प्रवेशासाठी करण्यात येणार असून निकषानुसार गुणवत्ता, आरक्षण आणि पसंतीक्रम विचारात घेऊनच प्रवेश दिले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.नियमित फेºयांनंतर विशेष फेरीचे आयोजन करण्यात येईल आणि ही फेरी सर्वांसाठी खुली असणार आहे. नेहमीप्रमाणे या प्रत्येक फेरीनंतर विद्यार्थ्यांना विविध पसंतीक्रम देता येतील किंवा बदलता येणार आहेत.अकरावी प्रवेश दुसराटप्पा - वेळापत्रक(१२ ते २२ आॅगस्ट)नियमित फेरीसाठी प्रवेश अर्जाचा दुसरा भाग भरणे. नवीन विद्यार्थी अर्जाचा भाग १ व भाग २ भरू शकतात.कोटांतर्गत प्रवेश करणे.कोटा प्रवेशाच्या रिक्त जागा प्रत्यार्पित करणे. प्रवेश फेरी १२३ ते २५ आॅगस्ट -(दुपारी १२ पासून ते सायंकाळी ५ पर्यंत)तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे.तात्पुरत्या गुणवत्ता यादीवर आक्षेप नोंदवणे.शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून आक्षेपांवर कार्यवाही.३० आॅगस्ट (३ वाजता)नियमित फेरी १ साठी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे.विद्यार्थ्यांना लॉगिनमध्ये संदेश पाठविणे, पहिल्या फेरीचे कट आॅफ संकेतस्थळावर दर्शविणे.३१ आॅगस्ट ते ३ सप्टेंबर (१० पासून ५ पर्यंत)विद्यार्थ्यांनी निवड झालेल्या महाविद्यालयात आॅनलाइन प्रवेश निश्चित करणे.यादरम्यान व्यवस्थापन, अल्पसंख्याक प्रवेश सुरू राहतील.यानंतरच्या फेºयांचे वेळापत्रक शिक्षण संचालनालयाकडून नंतर जाहीर करण्यात येईल.अकरावी प्रवेशासाठी उपलब्ध जागा - ३,२०,१२०नोंदणी केलेले विद्यार्थी - २,५१,३७९अर्ज लॉक केलेले विद्यार्थी- १९८७६४कागदपत्रांची पडताळणी झालेले विद्यार्थी - १,८९,२५७
अकरावी प्रवेशाचा उद्यापासून दुसरा टप्पा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 7:29 AM