शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
3
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
4
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
5
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
6
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
7
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
8
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
9
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
10
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
11
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
12
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
13
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
14
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
15
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल
16
आकाश कोसळले तरी चालेल, न्याय दिला गेलाच पाहिजे!
17
एकत्र लढतील, दिसतील; पण एकत्र राहतील?
18
निवडणुका अनेक, देश एक!
19
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
20
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय

मन्मथच्या आत्महत्येमागील गूढ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 2:45 AM

आयएएस अधिकारी मनीषा आणि मिलिंद म्हैसकर यांचा मुलगा मन्मथच्या आत्महत्येमागील गूढ अद्याप कायम आहे. या प्रकरणी त्याच्या मित्रांचे, तसेच अन्य

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : आयएएस अधिकारी मनीषा आणि मिलिंद म्हैसकर यांचा मुलगा मन्मथच्या आत्महत्येमागील गूढ अद्याप कायम आहे. या प्रकरणी त्याच्या मित्रांचे, तसेच अन्य संबंधितांचे जबाब नोंदविण्यास मलबार हिल पोलिसांनी सुरुवात केली आहे. मलबार हिल येथील दरिया महल या २० मजली इमारतीच्या गच्चीवरून पडून मन्मथचा मंगळवारी मृत्यू झाला. याच इमारतीच्या २० व्या मजल्यावर त्याचा मित्र वशिष्ट अग्रवाल राहतो. दोघेही शाळेपासूनचे मित्र आहेत. मंगळवारी सकाळी वशिष्टकडेच जातो, असे सांगून त्याने घर सोडले होते. सकाळी ६.५०च्या सुमारास इमारतीत प्रवेश केल्यानंतर, त्याने वशिष्टच्या घरी न जाता थेट गच्चीकडे जाणारा जिना गाठल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. त्यानंतर, सव्वा सातच्या सुमारास तो इमारतीवरून खाली पडला. घटनास्थळावरून मन्मथचा मोबाइलही ताब्यात घेण्यात आला आहे. त्यात कुठल्याही प्रकारचे संशयास्पद मजकूर अथवा अन्य माहिती आढळून आलेले नाही. घटनास्थळावरील परिस्थितीमुळे प्राथमिक तपासात त्याने आत्महत्याच केल्याचा संशय असल्याची माहिती पोलीस उपायुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिली, तर दुसरीकडे तो अपघात असल्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्या दिशेनेही आमचा तपास सुरू असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.