मुंबई : दहावीत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांची या वर्षीपासून कलमापन चाचणी करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. कलमापन चाचणीसंदर्भात व्यवसाय मार्गदर्शन संस्थेतील अधिकाऱ्यांसमवेतची बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या चाचणीबाबत नियोजनबद्ध आराखडा तत्काळ तयार करण्याचे आदेश शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी या बैठकीत दिले.दहावीतील विद्यार्थ्यांना करीअर कोणत्या क्षेत्रात करायचे आहे, याचा कल या कलमापन चाचणीतून कळेल. शिवाय, विद्यार्थ्यांमधील अभिरुची वाढविणे, क्षमता कोणत्या अभ्यासक्रमात आहे हे समजण्यास मदत होणार आहे. ही चाचणी डिसेंबर २०१५पूर्वी पूर्ण करण्यासाठी जिल्हानिहाय आराखडा तयार करण्यात येणार आहे. (विशेष प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी
By admin | Published: November 04, 2015 3:19 AM