पंढरपूर, दि. 14 - पंढरपूर शहरातील स्टेट बॅँक ऑफ इंडीयाच्या एटीएम मशीनमध्ये अधिकारी कसे पैसे भरतात याचं वारंवार निरक्षण करुन गपचूप 22 लाख 55 हजार 500 रुपयांची रक्कम सुरक्षा रक्षकाने पळवली आहे. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 7 लाख रुपयांची रोख रक्कम व बॅँकेतील 3 लाख 53 हजार अशी एकुण 10 लाख 53 हजार रुपये हस्तगत केले. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या बॅँकेच्या सुरक्षा रक्षकाचे नाव नागनाथ बाळू जाडकर (वय 22 वर्ष, रा. भटूंबरे, ता. पंढरपूर) असे आहे.
पंढरपूर शहरातील स्टेट बॅँक ऑफ इंडीया बॅँकेने एटीएम व एक डिपॉजिट मशिनच्या सुरक्षितीतेची जबाबदारी खाजगी सुरक्षा एजन्सी कडे दिली आहे. एटीएम सुरक्षेसाठी दोन सुरक्षा रक्षकाची पदे आहेत. त्यापैकी एक देवकते नावाचा सुरक्षा रक्षक आहे. व एन नागनाथ बाळू जाडकर नावाचा रक्षक असे दोन सुरक्षा रक्षक असून ते 12 ते 12 तासाचे सुरक्षा रक्षक महणून काम करतात.
एटीएम मशीनमध्ये पैसे संपल्यानंतर बॅँकेतील रोकड अधिकारी वंदना शिंदे व सुनिलकुमार गोंदी हे एटीएम मशीनचा बॅलेन्स चेक करुन त्यामध्ये नविन पैसे भरतात. मध्यांतरीच्या काळात 7 एप्रिल ते 22 एप्रिल या काळामध्ये एटीएममध्ये भरण्यात आलेल्या रक्कमेपैकी 22 लाख 55 हजार रुपयांची तफावत दिसून आली. त्यावरुन बॅँकेकडून पुण्यातून तंज्ञ इंजिनइर बोलावून घेवून एटीएम मशीनमध्ये काही तांत्रिक बिघाड आहे का याबाबत बॅँक व्यवस्थापकांनी शहानिशा केली. परंतु एटीएम तंज्ञांच्या मते मशीनमध्ये त्यांना कोणताही तांत्रिक दोष आढळून आला नाही.
त्यामुळे बॅँक प्रशासनापुढे गंभीर प्रश्र्न निर्माण झाला की, 22, लाख 55 हजार 500 रुपये रक्कम कशी कमी झाली. व त्याचा अपहार कोणी केला. तसेच बॅँकेच्या अधिकार्यांना सी.सी. टी. व्हीच्या फुटेजमध्ये बॅँकेचा सुरक्षा रक्षक नागनाथ बाळू जाडकर पहाटे 4 वाजता स्वतःचाच बॅलेन्स चेक करत असताना दिसून आला. यामुळे बॅँकेचा सुरक्षा रक्षक नागनाथ बाळू जाडकर (वय 22 वर्ष, रा. भटूंबरे, ता. पंढरपूर) याने अपहार केल्याचा संशय त्यांना आला होता. तसचे नागनाथ जाडकर याने एसबीआय बॅँकेतच स्वतःच्या खात्यावर 2 लाख 53 हजार रपुये जमा केले व 80 हजार रुपयांची एफ.डी. केली. त्यामुळे आरोपीच बॅँकेतील खाते व ठेवी सर्व सील केल्या. त्यानंतर आरोपी वारंवार जावून बॅँक व्यवस्थापकला माझे खाते व ठेवी सील का केले याबाबत विचारना करु लागला. त्यावरुन बॅँक मॅनेजर सुनिलकुमार गोंदी व वंदना शिंदे यांनी झाले प्रकाराबाबत पोलीस अधिक्षक विरेश प्रभू यांना कळविले.
यानंतर पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांनी यांचा तपासाची चक्रे फिरवून नागनाथ जाडकर याला ताब्यात घेतले. नागनाथ जाडकर कडून 7 लाख रुपये व बॅँकेतील 3 लाख 53 हजार अशी एकुण 10 लाख 53 हजार रुपये हस्तगत केले, असल्याची माहिती किशोर नावंदे यांनी दिली.
चोरीचे दाखविले प्रात्यक्षिक
आरोपीने प्रत्येक्षात पैसे कसे काढले याचे बँकेच्या अधिकार्यांसमोर आरोपीकडून प्रात्येक्षीत करुन दाखिवले. आरोपी याने एटीएम मशीन चावी शिवाय खोलून बॅँकेतील मेन मशीनमध्ये पासवर्ड कसा इन्टर करतात. व बॅँकेच्या पैशांची तिजोरी कशी खोलली जाते. पैसे कसे काढले यांचे प्रत्येक्षात प्रात्येक्षित करुन दाखविले.
चार वेळा केली चोरी
आरोपीने स्टेट बॅँक ऑफ इंडीया याच्या एटीएममधून 9 एप्रिल 2016 रोजी 15 लाख 50 हजार रुपये, 12 एप्रिल 2016 रोजी 2 लाख 9 हजार रुपये, 16 एप्रिल 2016 रोजी 2 लाख 97 हजार रुपये, 22 एप्रिल 2016 रोजी 1 लाख 99 हजार रुपये अशा पध्दतीने 22 लाख 55 हजार 500 रुपये काढून घेतले होते.
चोरलेल्या पैशातून मौज-मज्जा
आरोपीने चोरलले पैशांने शेतीत बोर घेवून बोरमध्ये मोटार बसवली. तसेच शेतीची सुधारणा केली. लोकांची उधारी फेडली. तसेच स्वतःकरीता व घरच्यांकरीता सोन्याचे दागिणे कपडे, मोबाईल खरेदी केली. त्यापैशांच्या आधारे त्यांनी मौज-मज्जा केली.
अशी केली चोरी
एटीएम मशीनमध्ये पैसे भरीत असताना मशीन पुर्ण ऑपरेट कशी करते याचा बारीक लक्षपुर्वक आभ्यास केला. तसेच मशीनमधील लॉक उघडताना पासवर्ड कसे टाकतात किती अंक असतात. याबाबत बॅँक अधिकारी पासवर्ड टाकत असताना लक्ष ठेवून सहा अंकी पासवर्ड बघीतला. त्यापैकी त्याच्या लक्षात चार अंक राहिले. पासवर्डचे शेवटचे दोन अंकात गोंधळ झाल्यामुळे त्यांनी एटीएममधील कोडच्या पहिल्या ओळीतील अंक बदलून अनेक वेळा एटीएम खोलण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात काही यश आले नाही. शेवटी शेवटच्या दोन अंक पत्येक अंकाला अंक लावून प्रयत्न केला. त्यामध्ये त्यास एटीएम पासवर्ड असूक मिळाला. त्याचे आधारे एटीएम चा पासवर्ड टाकून एटीएम मशीन पुर्णतः उघडून त्यातून 22 लाख 55 हजार 500 रुपयांची चोरी केली.