पुणे : देशांतर्गत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आपण धोरण असून त्याबाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे प्रतिप्रादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले़. देशभरातील पोलीस महासंचालकांच्या राष्ट्रीय पोलीस परिषदेत शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केले़. पाषाण रस्त्यावरील ‘आयसर’ (भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधनसंस्था) संस्थेच्या आवारात देशांतर्गत सुरक्षेवर तीन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. तंत्रज्ञानातील बदलांवर तसेच देशांतर्गत सुरक्षेवर या परिषदेत चर्चा केली जात आहे़. गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते शुक्रवारी या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले होते़. या परिषदेचा मुख्य विषय न्याय वैद्यकीय तपास आणि शास्त्रीय तपास असा आहे. शनिवारी पहिल्या सत्रात पंतप्रधान मोदी यांनी देशभरातील पोलीस महासंचालक तसेच तपास यंत्रणातील अधिकाºयांना मार्गदर्शन केले. तंत्रज्ञानातील बदल, त्याअनुंषगाने होणारा तपास, देशांतर्गत सुरक्षा तसेच दहशतवादी आणि नक्षलवादी कारवाया या विषयांवर मोदी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. देशांतर्गत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार आहे. सीमेपलीकडील शत्रूकडून देशाअंतर्गत सुरक्षेला आव्हान देण्यात येत आहे. देशांतर्गत सुरक्षेबाबत तडजोड केली जाणार नसून आपल्या देशातील तपास यंत्रणा बाह््यआक्रमणे तसेच छुप्या कारवायांचे आव्हान पेलण्यास सक्षम असल्याचे यावेळी मोदी यांनी नमूद केले. शनिवारी दिवसभर या परिषदेतील व्याख्याने मोदींनी लक्षपुर्वक ऐकली़ तीन दिवसांच्या परिषदेची सांगता रविवारी (९ डिसेंबर) होईल. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सल्लागार अजित डोवाल, उपसल्लागार दत्ता पडसलगीकर, केंद्रीय गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख अरविंद कुमार यांच्यासह १८० पेक्षा अधिक वरिष्ठ अधिकारी परिषदेत सहभागी झाले आहेत. ़़़़़़़़पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचा कारभार पाहण्याबरोबरच आपल्या ‘फिटनेस’लाही तितकेच महत्व देतात. दिल्लीबरोबरच देशातील कोणत्याही राज्यात किंवा परदेश दौऱ्यातही ते योगा व व्यायाम करण्यास विसरत नाहीत. ते राष्ट्रीय पोलीस परिषदेनिमित्त शुक्रवारी पुण्यात मुक्कामी आले आहेत. मोदी यांनी नेहमीप्रमाणे शनिवारी पहाटे योगा, ध्यानधारणा व हलकासा व्यायाम करण्यास प्राधान्य दिले. यावेळी त्यांच्यासोबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही योगासन केली. मोदी यांनी अधिकाऱ्यांना योगाचे महत्व पटवून दिले. त्यानंतर राजभवनात राज्य सैनिक कलयाण विभागाच्यावतीने आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ मोदी यांच्या हस्ते करण्यात आला़ त्यानंतर ते पाषाण येथील राष्ट्रीय पोलीस परिषदेला रवाना झाले़.
देशांतर्गत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य : नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2019 9:20 PM
सीमेपलीकडील शत्रूकडून देशाअंतर्गत सुरक्षेलाच आव्हान
ठळक मुद्देराष्ट्रीय पोलीस परिषदेत केले मार्गदर्शनमोदी देशाचा कारभार पाहण्याबरोबरच आपल्या ‘फिटनेस’लाही देतात तितकेच महत्व