शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

बियाणे प्रयोगशाळेस आयएसओ

By admin | Published: June 20, 2016 1:28 AM

देशातील प्रयोगशाळांची तपासणी करून मूल्यांकन करणाऱ्या नॅशनल अ‍ॅक्रिडिटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अ‍ॅण्ड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीजकडून (एनएबीएल) पुण्यातील कृषी विभागाच्या

पुणे : देशातील प्रयोगशाळांची तपासणी करून मूल्यांकन करणाऱ्या नॅशनल अ‍ॅक्रिडिटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अ‍ॅण्ड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीजकडून (एनएबीएल) पुण्यातील कृषी विभागाच्या बियाणे परीक्षण प्रयोगशाळेस नुकतेच प्रमाणपत्र देण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अत्याधुनिक प्रयोगशाळेतून तपासणी केलेले बियाणे मिळणार आहे. एनएबीएलकडून आयएसओ प्रमाणपत्र मिळणारी पुण्यातील बियाणे तपासणी व परीक्षण प्रयोगशाळा ही राज्यातील दुसरी शासकीय प्रयोगशाळा ठरली आहे.विविध कंपन्यांचे बियाणे बाजारात विक्रीला येण्यापूर्वी त्यांचे परीक्षण प्रयोगशाळेतून तपासून घेतले जाते. त्यानंतरच ते बाजारात येते. मात्र, काही शेतकरी घरचेच बियाणे शेतात पेरतात. मात्र, हे बियाणे पेरणीसाठी योग्य आहे की नाही, याच्या तपासणीसाठी पुणे, परभणी आणि नागपूर येथे कृषी विभागाच्या प्रयोगशाळा आहेत. शेतात पेरलेले जाणारे बियाणे चांगल्या प्रकारेचे असावे, शेतकऱ्यांना त्यातून चांगले उत्पादन मिळावे, याची काळजी प्रयोगशाळेतील कृषी अधिकाऱ्यांकडून घेतली जाते. मात्र, बियाणे तपासण्यासाठी वापरली जाणारी प्रयोगशाळाही आधुनिक असणे गरजेचे आहे. त्यामुळेच पुण्यातील कृषी विभागाच्या प्रयोगशाळेचे बीज परीक्षण अधिकारी व क्वालिटी मॅनेजर महादेव निंबाळकर यांनी एनएबीएलकडे याबाबतचा प्रस्ताव सादर केला. एनएबीएलच्या अधिकाऱ्यांनी पुण्यात प्रयोगशाळेला भेट देऊन त्यानंतर प्रमाणपत्र दिले आहे. महाविद्यालयांना नॅककडून मूल्यांकनाचे प्रमाणपत्र दिले जाते. त्याचप्रमाणे एनएबीएलकडून पुण्यातील प्रयोगशाळेला गुणवत्तचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. निंबाळकर यांना त्यांच्या कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले.महादेव निंबाळकर म्हणाले, की एखाद्या प्रयोगशाळेतील कामकाज राष्ट्रीयीकृत नियमाप्रमाणे चालत असेल तरच संबंधित प्रयोगशाळेस एनएबीएलकडून गुणवत्तेचे प्रमाणपत्र दिले जाते. त्यामुळे संबंधित प्रयोगशाळेतून तपासले जाणारे बियाणे देशात व परदेशातही विक्रीस पात्र ठरते. विविध बियाण्यांची विक्री करणाऱ्या कंपन्या पुण्यातील बियाणे तपासणी प्रयोगशाळेकडून तपासणी करून मगच बियाणे बाजारात विक्रीस आणतात, तर काही शेतकरीही आमच्याकडे घरातील बियाणे तपासणीसाठी देतात. गेल्या वर्षभरात राज्यातील सोळाहून अधिक जिल्ह्यातील सुमारे ८०० शेतकऱ्यांनी या प्रयोगशाळेतून बियाणे तपासले आहे. (प्रतिनिधी)