शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

पत्नी तक्रार देत असल्याचे पाहून पतीने घेतले पेटवून

By admin | Published: March 04, 2017 9:35 PM

पत्नी खोटी तक्रार देत असल्याचा समज करून संतप्त झालेल्या पतीने पेट्रोलची बाटली अंगावर ओतून पेटवून घेतले.

ऑनलाईन लोकमत

सातारा, दि. 4 -  पत्नी खोटी तक्रार देत असल्याचा समज करून संतप्त झालेल्या पतीने पेट्रोलची बाटली अंगावर ओतून पेटवून घेतले. एवढ्यावरच न थांबता त्याने पेटत्या अंगाने पोलिस चौकीत जाऊन धिंगाणा घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी आणि पत्नीने पाणी आणून आग विझविल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
 
अजय प्रियास्वामी गौडर (वय २७, सध्या रा. कर्मवीरनगर, अमर लक्ष्मीबस स्टॉप, औद्योगिक वसाहत, सातारा मूळ रा. बेळगाव) असे पेटवून घेतलेल्या पतीचे नाव आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असून, यामध्ये तो ४६ टक्के भाजून गंभीर जखमी झाला आहे. गौडर हा भाजी विक्रेता आहे. गेल्या काही दिवसांपासून पत्नी उमासोबत त्याचा वारंवार वाद होत होता. 
 
शनिवारी दुपारी पावणेपाचच्या सुमारास पत्नीसोबत वाद झाला. त्यामुळे रागाच्या भरात पत्नी औद्योगिक वसाहतीमधील पोलिस चौकीत तक्रार देण्यासाठी गेली. तिच्यापाठोपाठ अजयही पळत गेला. पोलिस चौकीच्या बाहेर उभा राहून पत्नी काय तक्रार देत आहे, हे कान देऊन तो ऐकत होता. सुमारे पंधरा मिनिटे झाल्यानंतर त्याने पत्नी पोलिसांना काय सांगत आहे. ते सर्व ऐकले. अचानक तो पोलिस चौकीच्या आवारात लावलेल्या दुचाकीकडे पळत गेला. अगोदरच त्याने पेट्रोलची बाटली आणली होती. ती बाटली घेऊन त्याने काहीक्षणातच स्वत:च्या अंगावर ओतून स्वत:ला पेटवून घेतले. 
 
त्यानंतर त्याने पळत थेट पोलिस चौकीतच प्रवेश केला. अजयच्या संपूर्ण शरीराने पेट घेतल्याचे दृष्य पोलिसांना दिसल्यानंतर त्यांची बोलतीच बंद झाली. टेबलाजवळ पोलिसांकडे पिण्याच्या तीन चार बाटल्या होत्या. या बाटल्या घेऊन पोलिस आणि त्याच्या पत्नीने आग विझविली. केवळ वीस ते पंचवीस सेकंदात हा प्रकार घडला. जखमी अजयला तत्काळ पोलिसांनी रिक्षामधून सिव्हिलमध्ये दाखल केले. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून  पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील हे स्वत: त्याचा जबाब नोंदवत होते.