शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
3
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
4
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
5
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
6
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
7
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
8
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
9
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
10
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
11
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
12
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
13
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
14
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...
15
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
16
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
17
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
18
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
19
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
20
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...

सीमा हैदरला चित्रपटाची ऑफर; मनसेचा 'त्या' चित्रपट निर्मात्याला 'खळ-खट्याक'चा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2023 2:18 PM

सीमा हैदरला चित्रपटाची ऑफर देणाऱ्या निर्मात्याला मनसे नेते अमेय खोपकर यांनी जाहीर इशारा दिला आहे.

Seema Haider-Sachin Meena Story: प्रियकरासाठी पाकिस्तानातून अवैधरित्या भारतात आलेल्या सीमा हैदरने भारतात खूप प्रसिद्धी मिळवली. अलीकडेच सीमा हैदरला एका चित्रपट निर्मात्याने त्याच्या चित्रपटात अभिनयाची ऑफर दिली होती. पण, आता हे प्रकरण वादाच्या भोवऱ्यात आले आहे. राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्या निर्मात्याला थेट इशारा दिला आहे. 

मेरठचे रहिवासी असलेले चित्रपट निर्माते अमित जानी यांनी सीमा हैदर आणि सचिनच्या प्रेमकथेवर 'कराची टू नोएडा' या नावाने चित्रपट बनवण्याची घोषणा केली आहे. यासोबतच त्यांनी सीमाला चित्रपटाची ऑफरही दिली आहे. या घोषणेनंतर अमित जानी यांना धमक्या आणि इशारे मिळत आहेत. मनसेचे सरचिटणीस आणि चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमय खोपकर (Amey Khopkar) यांनी ट्विटरद्वारे इशारा दिला आहे.

काय म्हणाले अमेय खोपकर? "पाकिस्तानी नागरिकाला भारतीय चित्रपटसृष्टीत कोणतंही स्थान असता कामा नये, या आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. सीमा हैदर ही पाकिस्तानी महिला सध्या भारतात आहे. ती ISI एजंट आहे, अशा बातम्याही पसरल्या होत्या. आमच्या इंडस्ट्रीमधील काही उपटसुंभ प्रसिद्धीसाठी त्याच सीमा हैदरला अभिनेत्री बनवतायत. देशद्रोही निर्मात्यांना लाजा कशा वाटत नाहीत? हे असले तमाशे ताबडतोब बंद करा, नाहीतर मनसेच्या धडक कारवाईसाठी तयार रहा, असा जाहीर इशारा देतोय. ऐकल नाही तर राडा तर होणारच..!!" असा इशारा अमेय खोपकर यांनी दिला आहे.

सीमा हैदरला चित्रपटाची ऑफरअलीकडेच जानी फायरफॉक्स लिमिटेडचे ​​व्यवस्थापकीय संचालक अमित जानी यांनी सीमा हैदरला त्यांच्या चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली आहे.  ते सीमा हैदर आणि सचिनच्या प्रेमकथेवर चित्रपट बनवणार आहेत, ज्याचे नाव 'कराची टू नोएडा' असेल. यासोबतच उदयपूर येथील शिंपी कन्हैयालाल हत्याकांडावर बनत असलेल्या चित्रपटासाठी अमितने सीमाला रॉ एजंटची भूमिका ऑफर केली आहे. यासोबतच त्यांनी भारतातून पाकिस्तानात गेलेल्या अंजूवरही एक चित्रपट बनवण्याची घोषणा केली आहे, ज्याचे नाव आहे 'मेरा अब्दुल ऐसा नहीं है'.

टॅग्स :MNSमनसेbollywoodबॉलिवूडPakistanपाकिस्तानIndiaभारतhusband and wifeपती- जोडीदारLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टRaj Thackerayराज ठाकरेMumbaiमुंबई