तळोजा : तळोजा एमआयडीसी येथे कोल्ड स्टोरेजच्या पडद्याआड गोमांसाची तस्करी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. काही दिवसांपूर्वी तळोजा येथील कोल्ड स्टोरेजमधील मांस सील करण्यात आले होते. तपासाअंती हे गोमांस असल्याचे उघड झाले आहे. बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार ६ जानेवारीला तळोजातील वेस्टर्न सुपर फ्रेश या कोल्ड स्टोरेज गोडाऊनवर छापा टाकला होता.पोलिसांनी तळोजा येथील कोल्ड स्टोअरेजमधील प्रति २० किलोचे १५१९ बॉक्स सील केले होते. यात १४४० या ब्रँडच्या नावाने तयार असलेले १५१९ बॉक्स ताब्यात घेण्यात आलेले होते. तपासात हे गोमांस असल्याचे उघड झाल्याने पोलिसांनी वरटेक्स अग्री प्रॉडक्ट्स या कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र, साठा करणाºया वेस्टर्न सुपर फ्रेश या कोल्ड स्टोरेजवर कोणतीही कारवाई न झाल्याने विश्व हिंदू परिषदेचे नवी मुंबई जिल्हामंत्री कृष्णा बांदेकर यांनी त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.कंपन्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह-तळोजा औद्योगिक परिसरात एकूण ६ कोल्ड स्टोरेज आहेत. या कोल्ड स्टोरेजमध्ये बाहेरगावी पाठवल्या जाणाºया विविध प्रकारच्या माशांचा साठा केला जातो. मात्र, वेस्टर्न सुपर फ्रेश या कोल्ड स्टोरेजमध्ये सापडलेल्या ३० हजार ३८० किलो गोमांसाच्या प्रकरणानंतर सर्वच कोल्ड स्टोरेजच्या कामकाजावर शंका उपस्थित होत आहे.तळोजा तसेच या परिसरातील असलेल्या कोल्ड स्टोरेजवर कोणाचेही नियंत्रण नाही. ३० हजार ३८० किलो गोमांसची साठवणूक करणाºया कोल्ड स्टोरेजवर देखील कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. तसेच तळोजातील इतर कोल्ड स्टोरेजची झाडाझडती घेऊन असे प्रकार करणारे गोडाऊन कायमचे सील करावेत.- कृष्णा बांदेकर, विश्व हिंदू परिषद नवी मुंबई जिल्हामंत्री
तळोजा एमआयडीसीत ३० हजार किलो गोमांस जप्त, गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 3:41 AM