मुंबई : यंदाच्या जून महिन्यात सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षापासून शालेय शिक्षण विभागाच्या वतीने सरकारी शाळांतून आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्यासाठी ‘ओजस’ आंतरराष्ट्रीय शाळा सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्यातील १३ शाळांची निवड करण्यात आली असून त्यांची यादी शालेय शिक्षण विभागातर्फे जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक येथील प्रत्येकी २ शाळांचा समावेश असून पुणे विभागातील ३ शाळांचा समावेश आहे.ओजस शाळांसाठी एकूण ३७८ शाळांनी अर्ज सादर केले होते. त्यापैकी १०९ शाळांना नामांकने प्राप्त होऊन त्यापैकी १३ शाळांची पहिल्या टप्प्यासाठी निवड करण्यात आली आहे. शिक्षण विभागाने या शाळांसाठी आवश्यक नियमावली जाहीर केली होती. या नियमावलीनुसार या शाळांची निवड करण्यात आली आहे.शिक्षक / मुख्याध्यापकांकडूनही मागवले अर्जया प्रकल्पामध्ये योगदान देऊ इच्छिणाºया व कार्य करण्यास इच्छुक असणाºया उत्कृष्ट शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्याकडूनही अर्ज मागवण्यात आले आहेत. या अर्जांमधून निवडक शिक्षक / मुख्याध्यापकांची निवड करून त्यांना कार्यशाळेसाठी बोलावण्यात येणार आहे. निवड झालेल्या शिक्षकांना मुंबईत निवासी प्रशिक्षणासाठी बोलावण्यात येणार असल्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत.मुंबईचा समावेश नाहीमुंबई शहरात आंतरराष्ट्रीय शाळांचे उत्तम उदाहरण असणाºया शाळा पूर्वीपासून अस्तित्वात असल्याने या शहराला ओजस शाळांसाठी वगळण्यात आले असून प्रामुख्याने ग्रामीण भागाचा विचार केला असल्याचे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले होते.
‘ओजस’साठी राज्यातील १३ शाळांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 7:23 AM