मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे विधानसभेवर निवडून गेल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी येत्या 24 जानेवारीला पोटनिवडणूक होणार आहे. मात्र, ही पोटनिवडणूक बिनविरोध झाली आहे. या पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार राजन तेली यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे महाविकास आघाडीचे संजय दौड यांनी बिनविरोध निवड झाली आहे.
संजय दौंड माजी मंत्री पंडितराव दौंड यांचे पुत्र आहेत. पंडितराव दौंड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे जुने संबंध आहेत. संजय दौंड यांनी अनेक वर्षे बीड जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम केल आहे. संजय दौंड 1992 पासून जिल्हा परिषद सदस्य आहेत. संजय दौंड काँग्रेसमध्ये आहेत, मात्र शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांना शब्द दिला होता, त्यामुळे आता विधानपरिषदेवर त्यांना संधी देण्यात आली आहे.
राजन तेली यांनी सावंतवाडी मतदारसंघातून शिवसेनेचे माजी राज्य मंत्री दीपक केसरकर यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढविली होती. यावेळी त्यांना पराभव पत्करावा लागला होता. शिवसेनेसोबत युती असल्याने राजन तेली यांनी आधी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. मात्र, नारायण राणे यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर सिंधुदुर्गातील तिन्ही मतदारसंघांमध्ये भाजपाने शिवसेनेविरोधात रसद पुरविली होती. यामुळे गोव्याच्या मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या नेत्यांनी तेली यांचा जोरदार प्रचार केला होता.
आणखी बातम्या..
संजय राऊतांच्या निषेधार्थ संभाजी भिडेंकडून आज 'सांगली बंद'चे आवाहन
गुजरातवरून ठाण्याच्या दिशेने जाणारी प्रवासी लक्झरी बसला आग, चालक अन् प्रवासी सुखरूप
मध्य रेल्वे विस्कळीत; सायन-माटुंग्यादरम्यान रेल्वे रुळाला तडे
इस्रोची पुन्हा एकदा गगनभरारी, GSAT-30 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण