लातूर : दलित, ओबीसी, मुस्लीम, भटके, आदिवासी समाजातील कार्यकर्त्यांनी पुकारलेल्या महा मूकमोर्चाच्या एल्गाराने मंगळवारी लातूरकरांना अभूतपूर्व शक्तीचे दर्शन घडविले. जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.अॅट्रॉसिटी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, ओबीसी व भटक्या विमुक्तांना अॅट्रॉसिटी कायदा लागू करण्यात यावा, मूळ आरक्षणास हात न लावता ओबीसी, भटक्या विमुक्तांना विधानसभा व लोकसभेत राजकीय आरक्षण देण्यात यावेत, सरकारने साखर कारखाने, खासगी शिक्षणसंस्था ताब्यात घ्याव्यात व त्यात आरक्षणाची तरतूद करावी आदी मागण्या मोर्चेकऱ्यांनी केल्या. मोर्चाचे एक टोक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होते तर दुसरे टोक दयानंद गेटवर होते. मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी जाताना रस्त्यावरचा कचरा वेचून स्वच्छता मोहीम राबविली. (प्रतिनिधी)
लातुरात स्वाभिमान संघर्ष मूकमोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2016 5:32 AM