ऑनलाइन लोकमतभोकरदन, दि . ६ : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या मातोश्री स्व. केशरबाई दादाराव दानवे यांच्या पार्थिवावर बुधवारी दुपारी साडेबारा वाजता जवखेडा खुर्द येथे हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अप्पासाहेब दानवे यांनी केशरबाई यांना मंत्राग्नी दिला. केशरबाई यांचे मंगळवारी दुपारी औरंगाबाद येथे खाजगी रूग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले होते. अंत्यसंस्कार प्रसंगी खा.दिलीप गांधी, विनय सहस्त्रबुद्धे, प्रतापराव जाधव, चंद्रकांत खैरे, ए.टी.नाना पाटील, कपिल पाटील, भास्कर खतगावकर, आ.राजेश टोपे, हर्षवर्धन पाटील, नरेंद्र पवार, नारायण कुचे, सुरजितसिंह ठाकूर, आर.टी.देशमुख, अर्जुन खोतकर, विक्रम काळे, चैनसुख संचेती, संगीता ठोंबरे, शशिकांत खेडेकर, अतुल सावे, सीमा हिरे, शिवाजी कर्डिले, महादेव जानकर, विनायक मेटे, अब्दुल सत्तार, संभाजी पाटील निलंगेकर, जयकुमार रावल, मंगलप्रभात लोढा, हरिभाऊ जावळे, सुमित्रा वाघ, महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहटकर, रवींद्र भुसारी, भाऊराव देशमुख, माजी आ. शिवाजी चोथे, अरविंद चव्हाण, किशनचंद तनवाणी, कैलास गोरंट्याल, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश जेथलिया, कल्याण काळे, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, जि.प. सीईओ दीपक चौधरी, पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह, प्रभाकर पालोदकर तसेच जिल्ह्यासह मराठवाड्यातील विविध पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, उद्योगपती, डॉक्टर्स, वकील, अभियंते, पत्रकार, विविध विभागाचे शासकीय अधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांची उपस्थिती होती. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून सांत्वनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दुपारी साडेतीन वाजता जवखेडा खुर्द येथे स्व. केशरबाई दानवे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे तसेच कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी विधानसभेचे सभापती हरीभाऊ बागडे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, सामजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, पालकमंत्री बबनराव लोणीकर, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, औरंगाबादच्या जिल्हाधिकारी निधी पांडे, पोलिस आयुक्त अमितेशकुमार, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्व. केशरबाई दानवे अनंतात विलीन
By admin | Published: July 06, 2016 10:11 PM