शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

‘सेल्फी’चा नाद जडतोय !

By admin | Published: January 10, 2016 1:42 AM

बस थांबा, रेल्वे स्टेशन, रस्ता, समुद्रकिनारा, कॉलेज कॅम्पस असे कोणतेही ठिकाण असले तरीही त्या ठिकाणी ‘सेल्फी’ काढला जातो. तरुणांमध्ये सेल्फीची क्रेझ जास्त आहे. वरकरणी हे वागणे

मुंबई : बस थांबा, रेल्वे स्टेशन, रस्ता, समुद्रकिनारा, कॉलेज कॅम्पस असे कोणतेही ठिकाण असले तरीही त्या ठिकाणी ‘सेल्फी’ काढला जातो. तरुणांमध्ये सेल्फीची क्रेझ जास्त आहे. वरकरणी हे वागणे सामान्य वाटत असले तरीही सतत सेल्फी काढणे हा एक मानसिक आजार आहे. जून २०१५मध्ये अमेरिकन मानसोपचारतज्ज्ञ संघटनेने सतत सेल्फी काढणे हा मानसिक आजार असल्याचे जाहीर केले आहे. या आजाराला ‘सेल्फायटिस’ असे वैद्यकीय भाषेत संबोधिले जाते. वांद्रे येथील बॅण्डस्टॅण्ड येथे सेल्फी काढण्याच्या नादात एका कॉलेज तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. यानंतर पुन्हा एकदा सेल्फी हा विषय प्रकाशझोतात आला. अनेकांचे पालक पाल्यांना ‘सेल्फी’मुळे ओरडत असतात. पालकांचे हे वागणे बरोबर आहे. सेल्फीच्या आहारी गेल्यास मानसिक आजार जडू शकतो, असे मानसोपचारतज्ज्ञांचे मत आहे. जी.टी.मधील मानसोपचार विभागात दोन तरुणींवर ‘सेल्फायटिस’ या मानसिक आजारासाठी गेल्या दोन महिन्यांपासून उपचार सुरू आहेत. या तरुणी दिवसातून किमान ५ वेळा सेल्फी काढायच्या. त्यातले काही सेल्फी त्या सोशल नेटवर्किंग साईटवर टाकायच्या. आता त्यांचे प्रमाण कमी झाले आहे. त्या दिवसाला दोन सेल्फी काढतात, असे डॉ. सागर मुंदडा यांनी सांगितले. वर्षभरात जगभरात १२ जणांचा मृृत्यू हा सेल्फी काढताना झाला आहे. कारण, अनेकांना सेल्फी काढताना आपण कुठे आहोत, आजूबाजूला कोण आहे, आपण कुठच्या परिस्थितीत आहोत याचे भान राहत नाही. त्यामुळे असे अपघात होतात, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)‘सेल्फायटिस’ कसा ओळखावा? स्मार्टफोन्समुळे एका क्लिकवर अनेक गोष्टी उपलब्ध होतात. त्यामुळे कामाच्या निमित्ताने स्मार्टफोन्स उपयोगी आहेत; पण, त्याचबरोबर दुष्परिणाम दिसायला लागले आहेत. स्मार्टफोनमध्ये फ्रंट कॅमेरा असतो. त्यामुळे स्वत:च फोटो काढण्याची क्रेझ पसरली आहे. सतत अशा प्रकारे सेल्फी काढणे. हे सेल्फी फोटो सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट करणे याचे व्यसन अनेकांना जडले आहे. यालाच वैद्यकीय भाषेत ‘सेल्फायटिस’ असे म्हणतात. फोटो काढण्याचा छंद असणे ही वेगळी गोष्ट आहे. पण, सतत सेल्फी काढणे म्हणजे त्याच्या आहारी जाणे हा मानसिक आजार आहे. त्यामुळे सर्वांनीच स्वत:वर नियंत्रण ठेवणे हा सर्वाेत्तम उपाय असल्याचे डॉ. मुंदडा यांनी सांगितले. ‘सेल्फायटिस’ कसा ओळखावा? ‘आठवणी फोटो रूपात साठवणे’ ही मानवी प्रवृत्ती आहे. पण, प्रत्येक आठवण अथवा गोष्ट, कार्यक्रम फोटो रूपात साठवून ठेवणे म्हणजे हे एक प्रकारचे व्यसनच आहे. स्मार्टफोन्समुळे ‘सेल्फायटिस’ हा नवीन मानसिक आजार तरुणांना जडतो आहे. या आजाराची लक्षणे एका दिवसात कमीतकमी तीन सेल्फी काढणे. पण, हे फोटो कोणत्याही सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट न करणेएका दिवसात कमीतकमी तीन अथवा जास्त सेल्फी काढणे; आणि सर्व फोटो सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट करणेदिवसातून कमीतकमी ६ सेल्फी काढणे; आणि हे सर्व फोटो लगेचच सोशल नेटवर्किंग साईटवर टाकणे