ऑनलाइन लोकमत
नंदुरबार, दि. 11 - शेतक-यांच्या कर्जमाफीचा मुद्दा देशभरात चर्चेत असताना भाजपाचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खरमरीत टीका केली आहे. कालर्पयत शेतक:यांच्या प्रश्नावर काँग्रेसला शिव्या घालत होतो. मात्र तीन वर्षापूर्वी वाजत गाजत ज्यांना सत्तेवर बसविले तेच चोर निघाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वापरलेल्या कोटची विक्री केली तरी महाराष्ट्रातील शेतक:यांची कजर्माफी होईल अशी बोचरी टिका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नंदुरबार येथे केली.
नंदुरबार येथे रविवारी दुपारी 12 वाजता शिवसेनेतर्फे शेतकरी मेळावा घेण्यात आला. यावेळी व्यासपीठावर ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. आपल्या भाषणात खासदार राऊत यांनी भाजपावर टीका केली. कालर्पयत आम्ही शेतक:यांच्या प्रश्नांवर काँग्रेसला शिव्या घालत होतो. तीन वर्षापूर्वी वाजत गाजत सत्तेवर बसविले ते देखील चोर निघाले. आता त्यांच्याकडून हिशेब मागत आहोत म्हणून त्यांच्या जिव्हारी लागत असल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले.
काँग्रेस व राष्ट्रवादीतील सर्व चोर आता कोणत्या पक्षात आहेत ते भाजपाला विचारा, त्यांनी वाल्याचे वाल्मिकी करण्याचे मशिन आणले का? असा सवाल त्यांनी केला. शेतक-यांना कजर्माफी देण्यासाठी केंद्र व राज्य शासन चालढकल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वापरलेले कोट विकले तरी महाराष्ट्रातील शेतक-यांची कजर्माफी होईल असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
दरम्यान, याच मेळाव्यात ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, “कर्जमाफीसाठी ऑक्टोबरपर्यंत थांबण्याची मुख्यमंत्र्यांची भाषा म्हणजे लबाडाच्या घरचं जेवण अशी गत आहे”