ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 1- 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन, कामगार दिवस. मात्र याच दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सेना-भाजपच्या युती सरकारवर टीकास्त्र सोडलं. दरवर्षी हुतात्मा स्मारक फुलांनी सजवलेल असते. महाराष्ट्र शासन ते फुलांनी सजवते. या वर्षी हुतात्मा स्मारकात एक फूल दिसत नाहीये, फुलाची एक माळ दिसत नाहिये. ही सरकारसाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट असल्याचं म्हणत राज ठाकरेंनी युती सरकारवर शरसंधान केलं आहे. दुर्दैवाने बोलावे लागत आहे की नालायक भाजपवाल्यांपेक्षा काँग्रेसवाले परवडले. त्यांच्या काळात हुतात्मा स्मारक किमान सजवलेलं असायचे, किमान. त्यांची महाराष्ट्राशी फारकत घेण्याची भूमिका कधी नव्हती. आज हे चित्र दिसत आहे ते अत्यंत घाणेरडे आहे, असं म्हणत त्यांनी सेना-भाजपच्या सरकारवर टीका केली आहे. शिवसेना भाजप सत्तेत असताना या वास्तूचा मान राखला गेला नाही, हे दुर्दैव आहे. कार्यक्रम हुतात्मा स्मारक येथे व्हायला हवा होता, मात्र त्यांना इथे येण्याची बहुदा लाज वाटत असावी, असं म्हणत युती सरकारचे वाभाडे काढले आहेत.