शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
3
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
4
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
5
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
6
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

मोबाइलवरून पाठवा खड्ड्यांचे छायाचित्र

By admin | Published: May 21, 2016 1:53 AM

गेली पाच वर्षे प्रभावी ठरलेल्या पॉटहोल ट्रॅकिंग सिस्टीमचे कंत्राट संपल्यामुळे पालिकेने आता मोबाइल अ‍ॅप आणण्याची तयारी केली आहे़

मुंबई : खड्डे शोधण्यासाठी गेली पाच वर्षे प्रभावी ठरलेल्या पॉटहोल ट्रॅकिंग सिस्टीमचे कंत्राट संपल्यामुळे पालिकेने आता मोबाइल अ‍ॅप आणण्याची तयारी केली आहे़ त्यानुसार १ जूनपासून मुंबईकर आपल्या विभागातील खड्ड्यांचे छायाचित्र काढून अ‍ॅपद्वारे विभाग कार्यालयापर्यंत पोहोचवू शकतील़दरवर्षी पावसाळ्यात मुंबई खड्ड्यात जाते़ हे खड्डे पालिका बुजवत असली तरी छोट्या रस्त्यांवरील खड्डे दुर्लक्षितच राहतात़ त्यामुळे २०११ मध्ये पालिकेने पॉटहोल ट्रॅकिंग सिस्टीम आणली़ त्यानुसार खड्ड्यांचे छायाचित्र मोबाइलवरून काढून थेट या संकेतस्थळावर पाठविणे शक्य होत होते़ खड्डे शोधण्याच्या या अनोख्या मोहिमेला नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिला होता़या संकेतस्थळावर वरिष्ठांचे लक्ष असल्यामुळे ४८ तासांमध्ये खड्डे बुजविण्याची खबरदारी अभियंते घेत होते़ मात्र १ एप्रिल २०१६ पासून या संकेतस्थळाचे कंत्राट संपले़ ही मोहीम प्रभावी असल्याने अखेर पालिका प्रशासन अ‍ॅपद्वारे खड्डे शोध मोहिमेला पुनरुज्जीवित करणार आहे. त्याचप्रमाणे खड्डे बुजविण्यासाठी ३५ कोटी रुपये खर्च येईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी दिली़ (प्रतिनिधी)>अ‍ॅपचा वापर असा होईल अ‍ॅपल किंवा अ‍ॅण्ड्रॉइड मोबाइलवरून नागरिकांनी त्यांच्या विभागातील खड्ड्यांचे छायाचित्र काढावे़ हे छायाचित्र जीपीएसद्वारे संबंधित विभाग कार्यालयांकडे पोहोचेल़ मात्र छायाचित्र दहिसरमध्ये काढून मालाडमध्ये आल्यानंतर पाठविण्याचा प्रयत्न केल्यास ते छायाचित्र जाणार नाही़ या अ‍ॅपवर सध्या संशोधन वेगात सुरू आहे़खड्डे कमी झाले़़़दोन वर्षांपूर्वी मुंबईत ४० हजार खड्ड्यांची नोंद झाली होती़ मात्र खड्डे त्वरित भरण्यात येत असल्याने तसेच रस्त्यांची नियमित डागडुजी व रस्त्यांचे काँक्रिटीकरण सुरू असल्याने गेल्या वर्षी केवळ ६ हजार खड्डे आढळून आले असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे़