शहरं
Join us  
Trending Stories
1
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
2
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
3
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा
4
INDW vs PAKW : रिचा घोषनं घेतला सुपर कॅच; पाक कॅप्टनचा खेळ खल्लास! (VIDEO)
5
"उत्तर गाझा खाली करा", IDF ची वॉर्निंग! इस्रायलकडून लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव, हिजबुल्लाहचा पलटवार
6
Bigg Boss18 च्या प्रीमियरला आले अनिरुद्धाचार्य महाराज, सलमानला भेट दिली भगवद् गीता
7
अमेरिकेतील यशानंतर 'अमूल' आता युरोपमध्ये ठेवणार पाऊल!
8
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर म्हणतो- "हा सन्मान..."
9
"सरदार पटेलांचा पुतळा पूर्ण झाला पण..."; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं
10
'इस्रायलने इराणवर हल्ले करावे, पण...', जो बायडेन यांचा बेंजामन नेतन्याहूंना सल्ला
11
धोनी, विराट की रोहित... भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण? 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेलने दिलं उत्तर
12
तिरुपती मंदिराबाबत नवा वाद, प्रसादात सापडले किडे; मंदीर प्रशासनाने दिले स्पष्टीकरण
13
"छत्रपतींच्या स्मारकालाच अडचणी का येतात?", रोहित पवार काय म्हणाले?
14
Gold Investment: दागिने घेण्याऐवजी सोन्यामध्ये 'या' 5 प्रकारे करा गुंतवणूक; मिळेल भरपूर रिटर्न
15
INDW vs PAKW : रेणुकाचा कमालीचा इन-स्विंग चेंडू; पाक बॅटर फक्त बघतच राहिली अन्..
16
संजय राऊतांना पवित्र करण्यासाठी अयोध्याला पाठवू; अब्दुल सत्तारांची बोचरी टीका
17
पाक विरुद्ध हरमनप्रीत कौरनं खेळली 'ही' चाल; या खेळाडूची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री
18
"स्मारकाच्या कामात स्थगिती आणणाऱ्या काँग्रेसच्या वकिलांचाही..."; संभाजीराजे छत्रपतींना फडणवीसांचा सल्ला
19
तिलक वर्मा की नितीश रेड्डी? मयंक यादव की रवी बिश्नोई? आकाश चोप्राने निवडली टीम इंडियाची Playing XI
20
तरुणाच्या आत्महत्येला मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री जबाबदार; मनोज जरांगेंनी काय दिला इशारा?

ज्येष्ठ संगीतकार रवींद्र जैन कालवश

By admin | Published: October 10, 2015 5:58 AM

प्रख्यात संगीतकार आणि गायक रवींद्र जैन यांचे मुंबईतील लीलावती इस्पितळात शुक्रवारी निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. सायंकाळी ४ वाजून १० मिनिटांनी त्यांनी अंतिम श्वास घेतला.

मुंबई : प्रख्यात संगीतकार आणि गायक रवींद्र जैन यांचे मुंबईतील लीलावती इस्पितळात शुक्रवारी निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. सायंकाळी ४ वाजून १० मिनिटांनी त्यांनी अंतिम श्वास घेतला. ते किडनीच्या विकाराने अत्यवस्थ होते. त्यांच्या पश्चात पत्नी दिव्या आणि मुलगा आयुष्मान असा परिवार आहे. हे दोघेही अंतिम क्षणी त्यांच्यासोबत होते.गेल्या रविवारी नागपुरात रवींद्र जैन यांची प्रकृती बिघडली होती. तेथे ते एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी गेले होते. प्रकृती बिघडताच त्यांना तेथील इस्पितळात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तेथून विमानाने त्यांना मुंबईत आणून लीलावती इस्पितळात दाखल करण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी सांताक्रुझ येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.

मूत्राशयाच्या संसर्गानंतर प्रकृती खालावलीसोमवारी त्यांना मूत्राशयाचा संसर्ग झाल्याने त्रास जाणवू लागला. अतिदक्षता विभागात त्यांना दाखल करण्यात आले होते. पण, किडनीला झालेला संसर्ग शरीरात पसरत गेला. किडनी निकामी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे लीलावती रुग्णालयाकडून सांगण्यात आले. 

चित्रपट संगीताशी जुळले नातेमधुर संगीताने ‘पहले से ज्यादा’ सुरेल दुनिया संगीतमय करणारे संगीतकार रवींद्र जैन यांचा जन्म २८ फेब्रुवारी १९४४ रोजी उत्तर प्रदेशातील अलीगढमध्ये झाला. पिता इंद्रमणी जैन संस्कृतचे जाणकार होते. तसेच आयुर्वेदाचार्य म्हणूनही त्यांची ख्याती होती. रवींद्र जैन यांच्या मातोश्री किरण जैन गृहिणी होत्या. रवींद्र जैन यांचा विवाह दिव्या जैन यांच्याशी झाला. यांना लहानपणापासूनच गायनाचा छंद होता. त्या काळचे प्रसिद्ध जैन कवी धनतंत्री आणि पं. बुद्धजनी यांच्या कविता ते जैन मंदिरात भक्तिभावाने गात. तेव्हा त्यांच्या आई-वडिलांनी संगीताचे शास्त्रोक्त शिक्षण देण्याचा निर्णय घेऊन पंडित जी. एल. जैन यांच्याकडे पाठविले. याशिवाय पं. जनार्दन शर्मा, पं. नाथू राम यांच्याकडून त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले.चित्रपट संगीत क्षेत्राशी नाते जोडण्यासाठी रवींद्र जैन यांनी १९६०मध्ये कोलकात्यात राहून संघर्ष केला; परंतु, यश आले नाही. १० वर्षांनंतर त्यांचे मित्र प्रतिभूषण भट्टाचार्य यांनी त्यांना मुंबईला आणल्यानंतर रवींद्र जैन यांनी भट्टाचार्य यांच्या ‘क्रांती’ आणि ‘बलिदान’ या चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन केले. १९७२मध्ये संगीतकार म्हणून कारकिर्द सुरू करताना त्यांनी मोहम्मद रफी यांच्या आवाजात पहिले गीत ध्वनिमुद्रित केले; तथापि, नशिबाने साथ न दिल्याने हे गीत लोकांपर्यंत पोहोचले नाही. तरीही न खचता त्यांनी संघर्ष चालूच ठेवला. 1974 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘चोर मचाए शोर’ या चित्रपटातील गाणी लोकप्रिय होताच ते प्रसिद्धीच्या झोतात आले. गीत गाता चल (१९७५), चितचोर (१९७६), ‘अखियों के झरोखों से’ या चित्रपटाला मिळालेल्या अपूर्व यशानंतर त्यांना मान्यवर संगीतकारांच्या पंक्तीत स्थान मिळाले. त्यांना स्वलिखित गीतांना संगीतबद्ध करणे आवडायचे. राजश्री प्रॉडक्शनच्या ‘सौदागर’ चित्रपटातील गाण्यांचे ध्वनिमुद्रण चालू असताना वडिलांच्या निधनाचे वृत्त कळले. तरीही ध्वनिमुद्रण न थांबविता त्यांंनी ते पूर्ण केले. ‘राजश्री’ व राज कपूर यांचे योगदानसंगीतमय दुनियेतील त्यांच्या यशात राजश्री प्रॉडक्शनचे ताराचंद बडजात्या आणि राज कपूर यांचे मोलाचे योगदान आहे. राजश्री प्रॉडक्शनच्या सर्व चित्रपटांना त्यांनी संगीताचा साज चढविला. ‘अखियों के झरोखों से’तील तुझे देखा जो सांवरे... या गाण्याने प्रभावित होऊन राज कपूर यांनी ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटाच्या संगीताची धुरा रवींद्र जैैन यांच्या हाती सोपविली. ‘राम तेरी गंगा मैैली’ या चित्रपटानंतर रणधीर कपूर दिग्दर्शित ‘हिना’ या चित्रपटाला त्यांनी संगीतमय केले. राजश्री प्रॉडक्शनच्या २००६मधील ‘विवाह’ या चित्रपटाचे संगीतही लोकप्रिय झाले. लोकप्रिय गाणी!कौन दिसा में लेकर चला (नदिया के पार)दिल में तुझे बिठा के (फकिरा)सजना है मुझे सजना के लिये (सौदागर)मै हूं खुशरंग हिना (हिना)एक राधा, एक मीरा (राम तेरीगंगा मैली)खुशिया ही खुशिया हो दामन में (दुल्हन वही जो पिया मन भाये)घुंगरू की तरह बजता रहा हूं मै (चोर मचाये शोर)मिलन अभी आधा अधुरा है (विवाह)आज से पहले आज से ज्यादा (चितचोर)देवा हो देवा (दो जासूस)लोकप्रिय गाणी!कौन दिसा में लेकर चला (नदिया के पार)दिल में तुझे बिठा के (फकिरा)सजना है मुझे सजना के लिये (सौदागर)मै हूं खुशरंग हिना (हिना)एक राधा, एक मीरा (राम तेरीगंगा मैली)खुशिया ही खुशिया हो दामन में (दुल्हन वही जो पिया मन भाये)घुंगरू की तरह बजता रहा हूं मै (चोर मचाये शोर)मिलन अभी आधा अधुरा है (विवाह)आज से पहले आज से ज्यादा (चितचोर)देवा हो देवा (दो जासूस)

1976मध्ये रवींद्र जन्ौ यांना चितचोर या चित्रपटाच्या संगीतासाठी फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.‘अखियों के झरोखों से’ आणि ‘हिना’ चित्रपटासाठीही त्यांना नामांकन मिळाले होते. ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटासाठी त्यांना १९८५मध्ये फिल्मफेअर मिळाले होते. २०१५मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री देऊन गौरविले.

अष्टपैलू कामगिरी आणि धडपडा संगीतकार म्हणून रवींद्र जैन कायमच रसिकांच्या लक्षात राहतील. त्यांच्या निधनाचे दु:ख आहे.- नरेंद्र मोदी, पंतप्रधानजैन यांच्या जाण्याने संगीत क्षेत्रातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व हरपले असून, संगीत क्षेत्राचे नुकसान झाले आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

रवींद्रजी एक महान संगीतकार, कवी, गायक होते. त्यांच्या जाण्याने दु:ख झाले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.- लता मंगेशकर, ज्येष्ठ गायिका दादूंचे निधन झाल्याची वार्ता ऐकून फार दु:ख झाले. माझ्यासाठी त्यांनी ‘हिना’ चित्रपटातील गाणी केली, याचा आनंद कायम राहील. - ऋषी कपूर, ज्येष्ठ अभिनेते

रवींद्र जैन महान, सर्जनशील संगीतकार होते. त्यांनी दिलेल्या संगीतातून ते सदैव जिवंत राहतील. - शान, गायकरवींद्रजींनी तयार केलेल्या प्रार्थना मला फार आवडायच्या. ‘हिना’ चित्रपटासाठी त्यांनी केलेले संगीत दिग्दर्शन आणि चित्रपटातील गाणी माझ्यासाठी सर्वोत्तम गाण्यांपैकी एक आहेत.- सोनू निगम, गायक

संगीतकार रवींद्र जैन यांच्या जाण्याचे दु:ख आहे. त्यांची जागा कोणीच घेऊ शकणार नाही.- झरिना वहाब, अभिनेत्रीरवींद्रजींच्या जाण्याने खूप दु:ख झाले. आज रवींद्रजींच्या जाण्याने संगीत क्षेत्रातील ंमौल्यवान रत्न गमावले. त्यांचे संगीत चिरंतन राहील.- सुरेश वाडकर, ज्येष्ठ गायक