आॅनलाईन लोकमतसातारा , दि. १९ : स्वातंत्र्याचा महामेरू व सातारा जिल्ह्यातील थोर स्वातंत्र्यसैनिक भिकू दाजी भिलारे (भि. दा. भिलारे गुरुजी) यांचे बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास मुुंबईतील निवासस्थानी वृध्दापकाळाने वयाच्या ९७ व्या वर्षी निधन झाले. भि.दा. गुरुजी यांचे स्वातंत्र्यलढ्यात खूप मोठे योगदान आहे. ऐन उमेदीचा काळात भिलारे गुरुजींनी स्वत:ला स्वातंत्र्यलढ्याला वाहून घेतले. त्या काळी त्यांच्यावर लहानपणापासून महात्मा गांधी, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या विचारांचा प्रभाव होता.भिलारे गुरुजींनी स्वत: ला स्वातंत्र्यासाठी वाहून घेतले. महाराष्ट्रातील घराघरात क्रांतिकारी विचार पोचविण्याचे काम आपल्या सवंगड्यांसोबत घेऊन गावोगावी भटकंती करत विचार पोचविण्याचे काम केले. गुरुजींच्या या कार्याचा गौरव करण्याकरिता महात्मा गांधी यांनी महाबळेश्वर येथून येऊन भि. दा. भिलारे गुरुजींचा गौरव केला होता.जावळी महाबळेश्वर तालुका पूर्वी एकत्र होता आणि या दुर्गम भागाची व्यथा फक्त गुरुजींना माहित होती. त्यावेळी गाड्यांची सुविधा उपलब्ध नव्हती, अशा वेळेस डोंगर कपाऱ्या उतरत लोकांपर्यंत पोचत लोकांच्या अडीअडचणी जाणून घेत त्यांच्या समस्या सोडविण्यास प्रधान्य देत असत. त्यांनी अनेक विधानसभेच्या निवडणुका जिंकत विधानसभेत प्रवेश केला आणि पूर्वीच्या जावळी मतदार संघाचा आमदार होण्याचे भाग्य मिळविले. या आमदारकीच्या काळात अनेक सवंगड्यांना सोबत घेऊन त्यानी सहकाराची मुहूर्तमेढ रोवली आणि जावळी तालुक्यात खऱ्या अथार्ने सहकार चळवळ चालू केली. त्या माध्यमातून गुरुजी सर्व राजकीय लोकांमध्ये लोकप्रिय झाले. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक स्थापना तसेच किसन वीर साखर कारखाना जावळी सहकारी बँक अशा अनेक सहकारी संस्था स्थापन करण्यात त्यांचे योगदान मोठे आहे. अलिकडच्या काळात सुद्धा अनेक आमदार खासदार हे भिलारे गुरुजींच्या मार्गदर्शन घेऊनच आपले कामकाज करीत असत.
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक भिलारे गुरुजी यांचं निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 4:03 PM
थोर स्वातंत्र्यसैनिक भिकू दाजी भिलारे यांचे बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास मुुंबईतील निवासस्थानी वृध्दापकाळाने वयाच्या ९७ व्या वर्षी निधन झाले.
भिलारची माती पोरकी...
भिलारची माती आज या थोर पितामहाच्या जाण्यामुळे पोरकी झाली आहे. भिलारे गुरुजींचे सर्व राजकीय लोकांशी सलोख्याचे संबंध होते. पांचगणी, महाबळेश्वरात येणारी प्रत्येक राजकीय व्यक्ती भिलारमध्ये येऊन भिलारे गुरुजींना न भेटता कधीच जात नसत.
महात्मा गांधींना नथुरामपासून वाचविलेमहात्मा गांधी यांच्यावर पांचगणी येथे जेव्हा नथुराम गोडसे याने सर्वप्रथम हल्ला केला, तेव्हा भिलारे गुरुजींनीच गांधीजींना वाचविले होते. नथुरामचा गांधींजीवर हल्ला करण्याचा हा पहिला प्रयत्न होता, तो भिलारे गुरुजींमुळेच फसला होता. भिलारे गुरुजी गांधींजीच्या मध्ये आल्यामुळे हा हल्ला टळला.