शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

ज्येष्ठ पत्रकार जे. डे. हत्या प्रकरण : अंडरवर्ल्डमध्ये वर्चस्व सिद्ध करण्यासाठीच हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2018 5:45 AM

अंडरवर्ल्ड जगतात आपले वर्चस्व कायम राहावे, यासाठी छोटा राजनने वरिष्ठ पत्रकार जे. डे. यांची निर्दयीपणे हत्या केली. या हत्येद्वारे त्याने दोन उद्दिष्ट साध्य केली.

मुंबई : अंडरवर्ल्ड जगतात आपले वर्चस्व कायम राहावे, यासाठी छोटा राजनने वरिष्ठ पत्रकार जे. डे. यांची निर्दयीपणे हत्या केली. या हत्येद्वारे त्याने दोन उद्दिष्ट साध्य केली. एक म्हणजे आपल्याविरुद्ध जाणाऱ्यांचे काय हाल केले जातील, हा संदेश त्याने प्रसारमाध्यांना दिला व त्याच माध्यमांच्या द्वारे त्याने सामान्यांना व अंडरवर्ल्ड जगाताला, आपण कमकुवत नसून अजूनही या क्षेत्रात सक्रिय असल्याचे दाखवून दिले, असे निरीक्षण विशेष मकोका न्यायालयाने छोटा राजनला जे. डे. यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरविताना नोंदविले.छोटा राजनविरुद्ध जे. डे. यांनी काही लेख लिहिले व एक पुस्तकही प्रकाशित करणार होते. त्यात त्यांनी छोटा राजनची भांडाफोड केली होती. याच पुस्तकात त्यांनी दाऊद कसा चांगला आहे आणि छोटा राजन कसा वाईट आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न केला होता. आपल्याला भारताविरुद्ध असल्याचा दाखविण्याचा प्रयत्न जे. डे. करत आहेत व ते दाऊदला मिळाले आहेत, असा संशय राजनला होता. गुन्हेगारी वृत्ती असलेल्या माणसाच्या डोक्यात संशय गेल्यानंतर, तो संशय असलेल्या माणसाला संपविण्याचाच प्रयत्न करतो आणि तेच राजनने केले, असे न्या. समीर आडकर यांनी निकालपत्रात म्हटले आहे.या केसमध्ये मकोका लावला जाऊ शकत नाही, असा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वकिलांचा होता. यातील काही आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही आणि त्यांच्यावर यापूर्वी गुन्हे नोंदविण्यात आलेले नाहीत. मकोका लागू करण्यासाठी आरोपींना त्या गुन्ह्यामुळे होणारे ‘अन्य फायदे’ काय आहेत, ते सिद्ध केलेले नाहीत, असा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वकिलांनी केला. मात्र, न्यायालयाने त्यांचा हा युक्तिवाद फेटाळला.या गुन्ह्याचा मास्टमाइंड छोटा राजन याच्यावर यापूर्वी दोन आरोपपत्रे दाखल करण्यात आली आहेत. मात्र, तो भारताबाहेर असल्याने त्याला अटक करता आली नाही. परंतु त्याला या हत्येमुळे आर्थिक फायदा होणार नसला, तरी त्याच्या जगतात त्याचे वर्चस्व कायम राहणार होते. जे. डे. यांच्या लेखामुळे राजन त्याच्या क्षेत्रात कमजोर झाल्याचा संदेश त्याच्या शत्रूंना, तपासयंत्रणा व सामान्यांना मिळणार होता. मात्र, आपण अद्यापही किती सामर्थ्यवान आहोत आणि जो कोणी आपल्याविरोधात लिहील किंवा बोलेल, त्याचे काय हाल करण्यात येतील, हे त्याच्या शत्रूंना व सामान्यांना दाखविण्यासाठी, तसेच त्याच्याशी व्यापार करत असलेल्या लोकांसमोर सिद्ध करण्यासाठी त्याने ही हत्या केली. त्यामुळे त्याच्यावर ठेवण्यात आलेला मकोका योग्य आहे, असेही निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.छोटा राजन याने जे. डे. यांच्या हत्येनंतर चार पत्रकारांना फोन करून या हत्येची जबाबदारी घेतली. मात्र, खटल्यादरम्यान त्याच्या वकिलांनी पत्रकारांनी त्याला या केसमध्ये गोवल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यांची साक्ष विश्वासार्ह नसल्याचे म्हटले. न्यायालयाने त्यांचे हे ही म्हणणे फेटाळले. छोटा राजन भारताच्या बाहेर होता. त्या वेळी त्याच्यापर्यंत कोणतीही तपासयंत्रणा पोहोचणार नव्हती. त्यामुळे त्याला हत्येची जबाबदारी घेण्यास कोणीतीही भीती नव्हती. कोणाच्याही दबावाखाली ही जबाबदारी घेण्यात आली नाही, तसेच पत्रकारांचे त्याच्याशी काही वैयक्तिक वैर नव्हते. तसे बचाव पक्षाने सिद्धही केले नाही. त्यामुळे पत्रकारांनी दिलेल्या साक्षींवर प्रश्नचिन्ह निर्माण होत नाही. त्यांना आंतरराष्ट्रीय नंबरवरून कॉल आलेले आणि तेव्हा राजनही भारतात नव्हता, असेही न्यायालयाने म्हटले.आरोप सिद्ध होत नाहीदरम्यान, पत्रकार जिग्ना वोराची निर्दोष सुटका करताना न्यायालयाने म्हटले की, तपासयंत्रणेच्या म्हणण्यानुसार, वोराने छोटा राजनला जे. डे. यांची हत्या करण्यास चिथावले. तिनेच त्यांचे फोटो आणि मोटारसायकलीची माहिती राजनला दिली. मात्र, या आरोपात तथ्य आहे, हे सिद्ध करण्यासाठी कोणतीही विश्वासार्ह पुरावा सादर करण्यात आला नाही. सादर करण्यात आलेल्या पुराव्यांवरून वोरा हिच्यावरील आरोप सिद्ध होत नाहीत.पहिल्यांदाच जन्मठेपेची शिक्षाछोटा राजनवर नोंदविण्यात आलेल्या अनेक केसेसपैकी एक जे. डे. हत्या प्रकरणाची केस आहे. यापूर्वी बनावट पासपोर्ट प्रकरणात त्याला सात वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्यानंतर, आता त्याला पहिल्यांदाच जन्मठेप सुनावण्यात आली आहे. जिग्ना वोराला सोडण्यात आले असले, तरीही संपूर्ण निकाल वाचल्याशिवाय मी यावर काही बोलू शकत नाही. - प्रदीप घरत, विशेष सरकारी वकीलअखेर यातूनसुटका झालीआता मी यातून सुटले आहे. यापेक्षा जास्त मी काहीही बोलणार नाही. - जिग्ना वोराव्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थितज्येष्ठ पत्रकार जे. डे. हत्याप्रकरणी संघटित गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या छोटा राजनला दोषी ठरवण्यात आले. दरम्यान, याआधी पत्रकार जिग्ना वोरा हिची निर्दोष मुक्तता करण्यात आली. याशिवाय सिमकार्ड पुरवल्याचा आरोप असणाºया पॉल्सन जोसेफ याचीही निर्दोष मुक्तता करण्यात आली.छोटा राजन सुनावणीदरम्यान व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायालयात उपस्थित होता.असा रचला हत्येचा कटरोही थंगप्पन जोसेफ उर्फ सतीश काल्या : कट रचण्यामध्ये काल्याचा सक्रिय सहभाग होता. नैनितालमधून शस्त्रे आणण्यापासून ग्लोबल सिम कार्ड मिळविण्याचे काम यानेच केले. तो सतत राजनच्या संपर्कात होता. ८ जून २०११ ते १० जून २०११ हे दोन दिवस तो जे. डे. यांच्यावर सतत नजर ठेवून होता. छोटा राजनने त्याला डे यांची हत्या करण्यासाठी पाच लाख रुपये दिले.अनिल भानुदास वाघमोडे : त्याने मोटारसायकलची सोय केली. कटाला अंतिम स्वरूप देताना त्याच्याच कॉलिसचा वापर करण्यात आला. रिव्हॉल्वर मिळविण्यासाठी वाघमोडे सतीश काल्याबरोबर नैनितालला गेला. डे यांची ओळख पटवून घेण्यासाठी तो ७ जून रोजी मुलुंडच्या उमा बारमध्ये गेला. डे यांच्या घरावर सतत नजर ठेवणाºया गटात तो होता. ११ जून रोजी त्याने डे यांच्या बाइकचा पाठलाग केला. अटक होऊ नये, यासाठी तो अन्य आरोपींसह गुजरात, शिर्डी, सोलापूर, विजयपूर आणि अन्य ठिकाणी फिरत राहिला.अभिजीत काशिनाथ शिंदे : नैनिताल रिव्हॉल्वर आणण्यासाठी हादेखील गेला होता. डे यांच्या घरावर नजर ठेवणाºया गटात याचाही सहभाग होता. ११ जून रोजी यानेही डे यांच्या बाइकचा पाठलाग केला. त्यांच्यावर गोळ्या झाडत असताना, शिंदेही घटनास्थळावर उपस्थित होता.नीलेश नारायण शेडगे : हा ही नैनिताल रिव्हॉल्वर आणण्यासाठी गेला होता. डे यांच्या घरावर नजर ठेवणाºया गटात याचाही सहभाग होता. ११ जून रोजी यानेही डे यांच्या बाइकचा पाठलाग केला. त्यांच्यावर गोळ्या झाडत असताना, शेडगेही घटनास्थळी उपस्थित होता. त्याने यामध्ये अभिजीत शिंदे व अरुण डाके यांनाही सहभागी केले.अरुण जनार्दन डाके : डाकेने सचिन गायकवाड याला यामध्ये सहभागी करून घेतले. ७ जून रोजी उमा बारमध्येही हाही गेला होता. डे यांच्यावर हल्ला करताना हा मोटारसायकलवर बसलेल्या काल्याच्या पाठच्या सीटवर बसला होता. घटनेनंतर तो पळून गेला. अटक केल्यानंतर त्याने पोलिसांना कबुलीजबाब दिला.मंगेश दामोदर आगनावे : मोटारसायकल पुरविली. ११ जून रोजी त्याने घाटकोपर ते पवई मोटारसायकल चालविली. त्यासाठी त्याने १०,००० रुपये घेतले.सचिन गायकवाड : १० व ११ तारखेला डे यांच्या घरावर नजर ठेवली. त्यानंतर, गुन्ह्यासाठी स्वत:ची मोटारसायकली दिली. ११ तारखेला त्याने स्वत: कॉलिस चालविली आणि त्या दिवशी डे यांचा घाटकोपर ते पवई पाठलाग केला.दीपक सिसोडीया : डे यांची हत्या करण्यासाठी रिव्हॉल्वरच्या २५ राउंडची व्यवस्था त्यानेच केली. अटक केल्यावर त्यानेही पोलिसांना कबुलीजबाबदिला.पॉल्सन जोसेफ पलित्रा : छोटा राजनच्या आदेशानंतर त्याने काल्याला दोन ग्लोबल सिम कार्ड मिळवून दिले, तसेच दोन लाख रुपयेही दिले. त्यानेच वोराची ओळख राजनशी करून दिली आणि त्यांना सतत संपर्कात ठेवले.जिग्ना वोरा : छोटा राजनच्या सतत संपर्कात होती. डे विरुद्ध राजनला सतत भडकवत राहिली.राजेंद्र सदाशिव निकाळजे उर्फ छोटा राजन : या सर्व घटनेचा मास्टरमाइंड.डे यांची हत्या करण्याचा आदेश छोटा राजननेच दिला.घटनाक्रम११ जून २०११ : वरिष्ठ पत्रकार ज्योतिर्मय डे (५६) यांची त्यांच्या राहत्या घराजवळ (हिरानंदानी गार्डन, पवई) बंदुकीची गोळी झाडून हत्या करण्यात आली. पवई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आणि तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला.२७ जून २०११ : मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाने शूटर सतीश काल्यासह अभिजीत शिंदे, अरुण डाके, सचिन गायकवाड, अनिल वाघमोडे, नीलेश शेंडगे आणि मंगेश अगवाने अशा सात जणांना अटक केली. त्यांची चौकशी केल्यानंतर, पोलिसांनी विनोद असरानी, दीपक सिसोडिया आणि पॉल्सन जोसेफ अशा आणखी तिघांना अटक केली.७ जुलै २०११ : अटक आरोपींवर मकोका लावण्यात आला.२५ नोव्हेंबर २०११ : डे यांच्या हत्येसाठी छोटा राजनला चिथावल्या प्रकरणी पत्रकार जिग्ना वोरा हिला अटक केली.३ डिसेंबर २०११ : मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाने आरोपींवर ३,००० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले. त्यात छोटा राजन व नयनसिंग भिश्त यांचा उल्लेख फरारी आरोपी म्हणून करण्यात आला.२१ फेब्रुवारी २०१२ : जिग्ना वोराविरुद्ध पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.२७ जुलै २०१२ : वोराची जामिनावर सुटका केली.१० एप्रिल २०१५ : विनोस असरानी