ऑनलाइन लोकमतपंढरपूर, दि. 22 - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक व जनता बँकेचे माजी संचालक डॉ. हरिभाऊ विठ्ठल मोहोळकर (वय 97) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. हेडगेवार यांच्याकडून त्यांनी संघाचे काम करण्यासाठी प्रतिज्ञा घेतली होती. ती त्यांनी शेवटपर्यंत पाळली. सन 1937 सालापासून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पंढरपूरात काम करण्यास सुरुवात केली. ते दंतवैद्य होते. दवाखान्यात आलेल्या गरीब रुग्णांवर ते मोफत औषधोपचार करत. गेल्या 80 वर्षापासून ते संघाचे काम करत होते. चंद्रभागा वाळवंटामध्ये शाखा सुरु करून तरुणांना संघात काम करण्याची संधी त्यांनी दिली. आपल्या गोड व प्रेमळ बोलण्याने ते अनेकांना आपलेसे वाटत. आणिबाणीच्या काळात त्यांनी 19 वर्षे कारावास भोगला.गोरगरीबांना आर्थिक मदत मिळून देण्यासाठी त्यांनी जनता बँकेच्या माध्यमातून काम केले. अनेक वर्षे ते बँकेचे संचालक होते. वैकुंठ स्मशानभूमी येथे डॉ.हरिभाऊ यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते डॉ मोहोळकर कालवश
By admin | Published: July 22, 2016 9:10 PM