शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
4
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
5
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
6
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
7
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
9
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
10
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
11
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
12
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
13
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
14
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
15
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
16
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
17
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
18
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
19
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
20
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी

ज्येष्ठ साहित्यिक वि. ग. कानिटकर यांचे निधन

By admin | Published: August 31, 2016 5:33 AM

ष्ठ साहित्यिक विनायक गजानन उर्फ वि. ग. कानिटकर यांचे मंगळवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९० वर्षांचे होते

पुणे : ज्येष्ठ साहित्यिक विनायक गजानन उर्फ वि. ग. कानिटकर यांचे मंगळवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. कानिटकर हे काही दिवसांपूर्वी घरात पडले होते, त्यामुळे उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांची प्राणज्योत माजवली. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.इस्रायल-युद्ध, युद्ध आणि युद्धच, ‘नाझी भस्मासुराचा उदयास्त’, ‘विन्स्टन चर्चिल’, ‘महाभारताचा इतिहास’, ‘होरपळ’ ही कानिटकर यांची पुस्तके साहित्य क्षेत्रात मैलाचा दगड ठरली आहेत. कानिटकर यांचा जन्म मालाड, मुंबई येथे २६ जानेवारी १९२६ रोजी झाला. बी. एसस्सी. आणि बी. ए. (आॅनर्स) अशा दोन पदव्या त्यांनी संपादन केल्या. केंद्र सरकारच्या अकाउंटंट जनरलच्या कचेरीत ३७ वर्षे त्यांनी नोकरी केल्यानंतर लेखनामध्ये ते अधिक काळ रमले. इतिहास व चरित्रे याविषयावर त्यांनी विपुल लेखन केले. ‘माओ क्रांतीचे’, व्हिएतनाम’, ‘अ‍ॅडॉल्फ हिटलरची प्रेमकहाणी’, ‘हिटलरचे महायुद्ध’, ‘अब्राहम लिंकन : फाळणी टाळणारा महापुरूष’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांच्या ‘फाळणी : युगांतापूर्वीचा काळोख’ या पुस्तकाला साहित्यसम्राट न. चिं. केळकर पारितोषिकही मिळाले आहे. ‘दर्शन ज्ञानेश्वरी : गाजलेल्या प्रस्तावना’ या ग्रंथाचे त्यांनी संपादन केले. फ्रँक वॉरेल आणि रोहन कन्हाय अशी मुलांसाठी त्यांनी चरित्रेही लिहिली. ‘खोला धावे पाणी’, शहरचे दिवे’ यांसारख्या कादंबऱ्या तसेच ‘मनातले चांदणे’, ‘आसमंत’, ‘सुखाची लिपी’, ‘लाटा’, ‘आणखी पूर्वज’, ‘जोगवा’ हे त्यांचे काही गाजलेले कथासंग्रह आहेत. ‘पूर्वज’ या त्यांच्या कथासंग्रहाला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. अनुवादाच्या क्षेत्रातही त्यांनी मौलिक लेखन कार्य केले. ‘संस्कार’, ‘वय नव्हतं सोळा’, ‘एक रात्रीची पाहुणी’, ‘अकथित कहाणी’ आणि ‘अयोध्या आणि हिंदू समाजापुढील प्रश्न’ ही त्यांची गाजलेली अनुवादित पुस्तके आहेत. (प्रतिनिधी)