ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २७ - ज्येष्ठ कवी, समीक्षक तसेच मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. दत्तात्रय भिकाजी कुलकर्णी उर्फ द.भि. कुलकर्णी यांचे बुधवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या ८२ व्या वर्षी पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात मुलगा व नात असा परिवार आहे.
२५ जुलै १९३४ साली नागपूरमध्ये जन्मलेल्या द.भि. यांनी नागपूर विद्यापीठातून पी.एच. डी व विदर्भ साहित्य संघाची साहित्य वाचस्पती ही डी.लिट समकक्ष पदवी संपादन केली. त्यांच्या अनेक ग्रंथांचा नागपूर, पुणे व उस्मानिया विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांत संदर्भग्रंथ म्हणून समावेश करण्यात आला आहे. २०१० साली पुण्यात झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते.
द.भि. कुलकर्णी यांना १९९१ साली महाराष्ट्र राज्याचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले तसेच 'अंतरिक्ष फिरलो पण' या ग्रंथाला महाराष्ट्र शासनाचा ’उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार’ मिळाला होता.
द.भि. कुलकर्णी यांचे प्रकाशित साहित्य :
- अंतरिक्ष फिरलो पण..
- अन्यनता मर्ढेकरांची
- अपार्थिवाचा यात्री
- अपार्थिवाचे चांदणे (आठवणी)
- कादंबरी : स्वरूप व समीक्षा
- चौदावे रत्न
- जीएंची महाकथा
- जुने दिवे, नवे दिवे(ललित लेख)
- दुसरी परंपरा
कथासंग्रह :
रेक्वियम
- मुख्यमंत्री देवेंद्र फटणवीस यांची ट्विट -
ज्येष्ठ समीक्षक आणि गाढे अभ्यासक श्री. द. भि. कुळकर्णी यांच्या निधनाने समीक्षा क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. एक अभ्यासू समीक्षकच नव्हे, तर साहित्याचा एक चांगला आस्वादक, विद्यार्थीप्रिय प्राध्यापक आपण गमावला आहे. असल्याचे असे ट्विट मुख्यमंत्री देवेंद्र फडणनीस यांनी केले आहे.
एका अन्या ट्विट मध्ये ते म्हणाले की, ज्ञानेश्वरी हा श्री. द. भि. कुळकर्णी यांच्या जिव्हाळ्याचा आणि अध्यापनाचा विषय होता. अनेक पिढ्यांना त्यांनी काव्य आणि ज्ञानेश्वरी शिकविली. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि हे दु:ख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबीयांना, आप्त-मित्रांना मिळो, अशी प्रार्थना करतो!
मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि हे दु:ख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबीयांना, आप्त-मित्रांना मिळो, अशी प्रार्थना करतो!— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 27, 2016
ज्येष्ठ समीक्षक आणि गाढे अभ्यासक श्री. द. भि. कुळकर्णी यांच्या निधनाने समीक्षा क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 27, 2016