ऑनलाइन लोकमत
मालवण, दि. 23 - उरण-अलिबाग येथे चार सशस्त्र बंदूकधारी दहशतवादी घुसल्याचे प्रकार घडला असताना किनारपट्टीवर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. दोन दिवस उलटले तरी सुरक्षा यंत्रणांना 'ते' दहशतवादी पकडण्यास यश आले नसताना मालवण किनारपट्टीवर (सिंधुदुर्ग) संशयितरित्या फिरताना एक विदेशी व्यक्ती येथील मच्छिमारांना दिसून आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील सुरक्षा यंत्रणेत एकच खळबळ उडाली आहे.
मालवण दांडी किनाऱ्यावर शुक्रवारी सायंकाळी उशिरा विदेशी पेहरावातील जॅकेटधारी व्यक्ती दिसून आली. मच्छीमारांनी त्या व्यक्तीला नाव व अन्य माहिती विचारण्याचा प्रयत्न केला असता तुपाने सुरुवातीला पाकिस्तान असे सांगितले. याबाबत मच्छिमारांनी तात्काळ मालवण पोलिसांना कल्पना दिली. त्यावेळी या विदेशी व्यक्तीने इज्राइल या देशातून आल्याचे सांगत तो दांडी तारकर्लीच्या दिशेने निघून गेल्याचे मच्छीमारांनी सांगितले.
त्या विदेशी व्यक्तिकडे जॅकेटच्या आतमध्ये शरीरावर बॅग असल्याचे काही मछिमारांनी पाहीले. याबाबत मालवण पोलिस यंत्रणेस माहीती देण्यात आली आहे. पोलिसांकडून तो व्यक्ती पर्यटक आहे की संशयित या दृष्टीने माहीती घेण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. घटनेची माहिती सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने मालवणसह सिंधुदूर्ग जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.