मुंबई : नफा वसुलीचा फटका बसल्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सुमारे १0५ अंकांनी कोसळून २८,६६८.२२ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही खाली आला. शुक्रवारी संपलेल्या आठवड्यात मात्र सेन्सेक्स ६९.१९ अंकांनी अथवा 0.२४ टक्क्याने, तर निफ्टी ५१.७0 अंकांनी अथवा 0.५८ टक्क्याने वाढला. दोन्ही निर्देशांक सलग तिसऱ्या आठवड्यात वाढले. खाजगी क्षेत्रातील अॅक्सिस बँकेचे समभाग सर्वाधिक ५.८४ टक्क्यांनी घसरले. आयसीआयसीआय बँक आणि एसबीआयलाही मोठा फटका बसला. सेन्सेक्स सकाळी तेजीसह उघडला होता. त्यानंतर काही काळ तो वर चढताना दिसून आला. तथापि, ही गती त्याला कायम ठेवता आली नाही. नंतर तो घसरणीला लागला. सत्राच्या अखेरीस १0४.९१ अंकांची घसरण नोंदवून तो २८,६६८.२२ अंकांवर बंद झाला. निफ्टी ३५.९0 अंकांनी अथवा 0.४0 टक्क्याने घसरून ८,८३१.५५ अंकांवर बंद झाला. (प्रतिनिधी)
सेन्सेक्स कोसळला
By admin | Published: September 24, 2016 5:38 AM