मुंबई : एसटीला राज्यशासनाचा विभाग म्हणून दर्जा मिळावा, रेल्वेप्रमाणे राज्य शासनाच्या अर्थसंकल्पात एसटीच्या अर्थसंकल्पाचे विलीनीकरण करावे. अशा विविध मागण्यासाठी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून आगळे वेगळे आंदोलन केले. रक्तदान करणाºया कर्मºयांच्या सह्यासह निवेदन सरकारला दिले जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस संघटनेच्यावतीने दिली.मुंबई सेंट्रल येथे शनिवारी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस संघटनेच्यावतीने रक्तदान करून आंदोलन केले. आमदार भाई जगताप व एसटी कर्मचारी काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी जेष्ठ संपादक संजय मलमे उपस्थित होते. सकाळी ९ पासून ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत १०० एसटी कर्मचाºयांनी रक्तदान केले. एसटी कर्मचारी म्हणाले की, ३१ मार्च २०२० नंतर नवी वेतनवाढ लागू होईल. त्यावेळी पूर्वीची दर चार वर्षांनी होणारी करारपद्धती रद्द करून शासनाप्रमाणे वेतन व भत्ते एसटी कर्मचाºयांना लागू करा.एसटी मित्र म्हणून पत्रकारांचा सन्मानप्रवासी आणि कर्मचाºयांचे हित बघून बातम्या तयार करणाºया, अडचणीतल्या एसटीची नेहमी बाजू घेऊन मदत करणाºया मुंबईतील एसटी विषयातील ११ पत्रकारांंचा सन्मानचिन्ह देऊन गौरव केला.
कर्मचाऱ्यांचे रक्तदान करून आगळेवेगळे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 3:55 AM