शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

तृतीयपंथीयांसाठीही हवे स्वतंत्र स्वच्छतागृह

By admin | Published: September 02, 2016 6:04 AM

महिलांना समान स्थान असल्याचे समाजात भासवले जात असले तरीदेखील अजूनही महिलांना मूलभूत हक्कांसाठी लढावे लागत आहे. याचेच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पाच वर्षांपूर्वी मुंबईत

मुंबई : महिलांना समान स्थान असल्याचे समाजात भासवले जात असले तरीदेखील अजूनही महिलांना मूलभूत हक्कांसाठी लढावे लागत आहे. याचेच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पाच वर्षांपूर्वी मुंबईत उभी राहिलेली ‘राईट टू पी’ ही चळवळ. या चळवळीला देशपातळीवर नेण्यासाठी आयोजित अधिवेशनात तृतीयपंथीयांचा स्वच्छतागृहांचा प्रश्न समोर आला. त्यामुळे खऱ्या अर्थाने ‘राईट टू पी’चे एका विशिष्ट पातळीवर विस्तारीकरण झाल्याचे या वेळी स्पष्ट झाले. नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये कोरो संस्था आणि राईट टू पी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राईट टू पी’चे राष्ट्रीय पातळीवरील अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनात राज्यासह देशातील विविध भागांमधून महिलांसाठी काम करणाऱ्या संघटना एकत्र आल्या. त्यामध्ये छत्तीसगड येथून तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या संस्थेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यांनी महिला मुताऱ्यांप्रमाणेच तृतीयपंथीयांना स्वतंत्र स्वच्छतागृहे हवी असल्याकडे लक्ष वेधले. या अधिवेशनात आमदार नीलम गोऱ्हे, आमदार विद्या चव्हाण, भाजपाच्या नेत्या शायना एनसी आणि मनसे नेत्या शालिनी ठाकरे, सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ, पत्रकार निखिल वागळे, प्रियंका कौल उपस्थित होते. ‘राईट टू पी’ ते ‘राईट टू सीटी’ या चर्चासत्रात उपस्थितांनी स्मार्ट सिटीपासून महिला मुताऱ्या, त्यांची अवस्था अशा विषयांवर चर्चा केली. महिला मुताऱ्यांचा प्रश्न मांडताना हा प्रश्न आहे का? असे आम्हालाच आधी विचारले जात होते. पण, आता मानसिकता बदलत आहे. या प्रश्नासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे. स्मार्ट सिटीचा विचार करताना स्वच्छतागृहांचा विचार नक्कीच केला जाईल. पेट्रोलपंपवाले तिथली स्वच्छतागृहे महिलांना वापरण्यासाठी द्यायला तयार आहेत. पण, त्यासाठी परवानगी मिळत नाही. चळवळ पुढे नेण्यासाठी थेट वरून आदेश येतील, असे पाहिले पाहिजे. प्रत्येकाशी बोलत राहण्यापेक्षा हा चांगला उपाय असल्याचे मत आमदार नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले. मनसे नेत्या शालिनी ठाकरे म्हणाल्या, ‘टू पी आॅर नॉट टू पी इज द क्वेश्चन’ हा प्रश्न आजच्या सर्व महिलांच्या डोक्यात असतो. मुंबईसारख्या शहरातही शौचालये, मुताऱ्यांची सोय नाही. स्वातंत्र्यानंतरही महिलांना मूलभूत हक्कासाठी का झगडावे लागत आहे? स्वच्छता आणि आरोग्य हे महिलांचे प्रश्न सुटलेले नाहीत. यावर सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. पुढच्या पिढीला आपण काय देणार आहोत, याचा विचार व्हायला हवा. भाजपा नेत्या शायना एनसी यांनी सांगितले, ‘राईट टू पी’ चळवळीबरोबरच भारतीयांना ‘हाऊ टू पी’ हे शिकवण्याची आवश्यकता आहे. राज्यातील ७० महिलांचा मृत्यू हा ‘सॅनिटायझेशन रिलेटेड सायकोलॉजिकल स्ट्रेस’मुळे (एसआरपीएस) झाला आहे. पण या आजाराविषयी महिलांमध्ये अजूनही जनजागृती नाही. यावरून या विषयाकडे किती गांभीर्याने पाहिले पाहिजे, हे स्पष्ट होते. स्वच्छतागृहांच्या प्रश्नावर बायोटॉयलेट हे उत्तर नाही. त्यासाठी वेगळे मार्ग शोधले पाहिजेत. (प्रतिनिधी)उद्या सादर करणार गृहनिर्माण धोरणमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाली आहे. उद्या गृहनिर्माण धोरण जाहीर होणार असल्याची माहिती नीलम गोऱ्हे यांनी दिली. अनेक वर्षे लोक ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहत आहेत. एसआरएचे प्रकल्प आहेत. गृहनिर्माण धोरणात नक्कीच स्वच्छतागृह, महिला मुताऱ्यांचा विचार झाला असेल, असे मत गोऱ्हे यांनी व्यक्त केले.