ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ - ' श्रीहरी अणेंचं डोकं शरीरापासुन वेगळं करा.. मग त्यांना कळेल की महाराष्ट्राला तोडण म्हणजे काय असत!!' असे वादग्रस्त विधान करत काँग्रेस आमदार नितेश राणेंनी अणेंवर हल्ला चढवला आहे. त्यांच्या या वादग्रस्त ट्विटमुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.
मराठवाडा व विदर्भाचे दु:ख सारखेच आहे. उलट मराठवाड्यावर विदर्भापेक्षा जास्त अन्याय झाला, त्यामुळे विदर्भाबरोबर मराठवाडाही स्वतंत्र व्हावा, असे मत राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी रविवारी जालना येथे व्यक्त केले होते. त्यांच्या या विधानावरून राज्यातीन नेत्यांनी नाराजी दर्शवली असून अणे हे महाराष्ट्रातील ओवेसी असल्याची टीका शिवेसेने प्रताप सरनाईक यांनी केली आहे. तसेच शिवसेना अणेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार असल्याचेही स्पष्ट केले. तर १०५ हुतात्मांच्या बलिदानानंतर मिळालेल्या महाराष्ट्र राज्याचे तुकडे पाडू इच्छिणारे अणे यांची महाधिवक्ता पदावरून उचलबांगडी करावी अशी मागणी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केली.
या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र व आमदार नितेश राणेंनीही ट्विटरवरून त्यांना लक्ष्य केले आहे.
आणेंच डोक शरीरा पासुन वेगळ करा..मग यांना कळेल की महाराष्ट्राला तोडण म्हणजे काय असत!!— nitesh rane (@NiteshNRane) March 21, 2016