ऑनलाइन लोकमत
शेगाव, दि. ९ - विदर्भावर होणारा अन्याय बघता विदर्भाचे वेगळे राज्य ही गरज आहे.याचे महत्व पटवून देण्यासाठी नव्याने स्थापन झालेल्या विदर्भ माझा पक्षाकडून मंगळवारी श्रींच्या पालखी सोहळ्यात वेगळ्या विदर्भाचा गजर करण्यात आला.
देशातील सत्तेचे राजकारण करणार्या काँगेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी वैदर्भीय जनतेचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे आता या पक्षांवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही. या पार्श्वभूमीवर हा नवीन पक्ष वैदर्भिय जनतेच्या विश्वासास पात्र ठरेल असा प्रयत्न आम्ही करू ही ग्वाही देत वेगला विदर्भ झालाच पाहिजे यासाठी
मंगळवारी विदर्भ माझा पक्षा चे नागपुर जिल्हाध्यक्ष नाना ठाकरे आणि विदर्भ सरचिटणीस मंगेश तेलंग यांनी खामगाव वरुण शेगाव कड़े येणाऱ्या भक्तांना वेगळा विदर्भाच्या टोप्या घातल्या. सायंकाल पर्यन्त ३ हजार टोपयांचे वितरण त्यांनी केले. याशिवाय शहरातील ऑटो वर्हि स्टिकर चीत्काविन्यत आले. विदर्भाचे वेगळे राज्य व्हावे हीच आमची संकल्पना असून विदर्भाबाहेर आम्हाला पक्षाचा विस्तारही करायचा नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
विदर्भावर होणारा अन्याय बघता विदर्भाचे वेगळे राज्य ही गरज आहे. देशातील सत्तेचे राजकारण करणार्या काँगेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी वैदर्भीय जनतेचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे आता या पक्षांवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही. या पार्श्वभूमीवर हा नवीन पक्ष वैदर्भिय जनतेच्या विश्वासास पात्र ठरेल असा प्रयत्न आम्ही करू ही मंगेश तेलंग यांनी दिली.