शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
3
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
4
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
5
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
6
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
7
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
8
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

दीक्षांत समारंभाला सप्टेंबरचा मुहूर्त

By admin | Published: June 05, 2014 1:02 AM

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शंभराव्या दीक्षांत समारंभाला सप्टेंबर महिन्याचा मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे. परीक्षा मंडळाच्या बैठकीत यासंबंधात हिरवी झेंडी दाखविण्यात आली आहे.

नागपूर विद्यापीठ : माजी राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम उपस्थित राहणारनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शंभराव्या दीक्षांत समारंभाला सप्टेंबर महिन्याचा मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे. परीक्षा  मंडळाच्या बैठकीत यासंबंधात हिरवी झेंडी दाखविण्यात आली आहे. या समारंभास माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी उपस्थित  राहण्यासाठी सिद्धांतता संमती दिली आहे. व्यवस्थापन परिषदेने अंतिम मान्यता दिल्यानंतर डॉ. कलाम यांना निमंत्रण पत्र पाठविण्यात येईल, अशी  माहिती विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू अनुपकुमार यांनी दिली.विद्यापीठाचा शंभरावा दीक्षांत समारंभ गेल्या वर्षी १६ नोव्हेंबर रोजी होणार होता. परंतु एकही नियमित प्राध्यापक नसलेल्या महाविद्यालयांत विद्यार्थ्यांंंचे  अंतर्गत गुण नियमबाह्य पद्धतीने देण्यात आल्याने पदव्या वैध कशा, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यातच समारंभाचे मुख्य अतिथी  राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा नागपूर दौराच रद्द झाल्याने दीक्षांत समारंभ अनिश्‍चित काळासाठी समोर ढकलण्यात आला होता. त्यानंतर सातत्याने  दीक्षांत समारंभ कधी होणार, असा प्रश्न विद्यार्थ्यांंंकडून उपस्थित करण्यात येत आहे. यासंबंधात बुधवारी झालेल्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत चर्चा  करण्यात आली. यात परीक्षा मंडळाने २१, २२ व २३ सप्टेंबर या तारखा दीक्षांत समारंभाच्या आयोजनासाठी सुचवल्या आहेत. यातील कोणत्याही  एका दिवशी दीक्षांत समारंभ घेण्यात येऊ शकतो. यासंबंधी पुढील आठवड्यात होणार्‍या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मान्यता मिळाल्यानंतर डॉ.  कलाम यांना विद्यापीठातर्फे निमंत्रण पत्र पाठविण्यात येईल, असे अनुपकुमार यांनी सांगितले. १0 ते १२ सप्टेंबर दरम्यान ‘नॅक’ समिती विद्यापीठाची  पाहणी करण्यासाठी येणार आहे. या समितीचा दौरा आटोपल्यानंतर दीक्षांत समारंभाची तयारी करण्यात येईल असेदेखील अनुपकुमार यांनी म्हटले.  (प्रतिनिधी)