पालघर : आर्थिक विवंचनेतून आई व मुलाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी रात्री पालघरमध्ये घडली. यात आईचा मृत्यू झाला. मुलावर पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रिबेका गोपाळ रामचंद्रन (६२) व रोहन रामचंद्रन (२८) अशी त्यांची नावे आहेत. एका इंग्रजी मालिकेतील आत्महत्येच्या प्रसंगाचे अनुकरण करीत त्यांनी घरात सायलेन्सरमधून निघालेला कार्बन डायआॅक्साइड पसरवला होता. रिबेका यांच्या पतीचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यांनी आधी अंधेरी, नंतर वसई येथील फ्लॅट विकून पालघरजवळील अल्याळीत (आंबेवाडी) त्या राहू लागल्या. त्यांचा मुलगा रोहन याला लेखनाची आवड होती. त्याने ‘एव्हिल लँड’ आणि ‘पास्ट इल्युजन’ हे दोन कथासंग्रह लिहिले होते. परंतु वाचकांचा योग्य प्रतिसाद न मिळाल्याने प्रकाशकाने मानधन देण्यास नकार दिला होता. फ्लॅट विकून मिळालेले पैसे संपल्याने आणि त्यातच मानधनही न मिळाल्याने उदरनिर्वाह चालविणे कठीण बनले होते. (वार्ताहर)
मालिका पाहून केली आत्महत्या
By admin | Published: January 29, 2015 5:55 AM