अतुल कुलकर्णी
मुंबई : अलीकडच्या काळात सभागृहात सौहार्दपूर्ण वातावरण राहिलेले नाही. गांभीर्यही कमी होत आहे. प्रश्नांना उत्तरे मिळतात, पण प्रश्न सोडवले जातात का, असा सवाल करत, याला दोन्ही बाजूंचे सदस्य आणि कामाकाजाची पद्धतीही काही अंशी जबाबदार आहे, अशी खंत विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.चालू पावसाळी अधिवेशनात पहिल्या आठवड्यात वळसे पाटील यांनी कामकाजाबद्दल सतत नाराजी व्यक्त केली होती. काही मुद्दे मांडले, पण त्यावर निर्णय झाले नाहीत, यावरही त्यांनी भाष्य केले होते.दुसºया आठवड्याच्या पहिल्या दिवशीही शिवसेनेचे आ. जयप्रकाश मुंदडा, भाजपा काँग्रेसचे सदस्यही आम्हाला सभागृहात बोलू द्या ,असे म्हणत नाराजी व्यक्त करताना दिसले. वळसे पाटील यांनी प्रश्नोत्तराचातास संपत आलेला असतानापाच मिनिटे वेळ वाढवा, पण मुद्दामांडू द्या, असे सांगितले, पण बरोबर१२च्या ठोक्याला अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी प्रश्नोत्तराचा ताससंपल्याचे घोषित केले. त्यानंतर,वळसे पाटील सभागृहाबाहेर निघून गेले.यावर ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, ‘या सभागृहाने अनेक संघर्ष पाहिले आहेत, मार्ग काढून पुढे जाणारे नेते, पिठासीन अधिकारी पाहिले आहेत. सामाजिक प्रश्नांवर एका उंचीवर जाणारी भाषणे पाहिली आहेत. विकासासाठी राजकीय अभिनिवेश बाजूला सारून समाज एकत्र ठेवण्याच्या दृष्टीने निर्णय झाल्याचे या सभागृहाने पाहिले आहे. प्रचंड उंचीचे नेते, त्यांचे विचार या सभागृहाने अनुभवले आहेत.