शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब... काय तो स्टॅमिना! धड झोप नाही, खाण्याची वेळ नाही, प्रचारादरम्यान, नेतेमंडळी कोणती काळजी घेतात?
2
थंडीविना केवळ १९ टक्के क्षेत्रावरच रब्बीच्या पेरण्या, ज्वारी ३४ टक्के, हरभरा १७, गव्हाचा केवळ ४ टक्के पेरा पूर्ण
3
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
4
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
5
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
6
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
7
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
8
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
9
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
10
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
11
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
13
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
14
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
15
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
17
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
18
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
19
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
20
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

सर्पमित्रांकडून सापांना जीवदान

By admin | Published: August 23, 2016 1:35 AM

निसर्गातील वाढत्या हस्तक्षेपामुळे जंगली प्राण्यांचा मानवी वस्तीकडे वावर वाढला आहे़

पिंपरी : निसर्गातील वाढत्या हस्तक्षेपामुळे जंगली प्राण्यांचा मानवी वस्तीकडे वावर वाढला आहे़ वन्यप्राण्यांबरोबर मोठ्या प्रमाणावर सापांचा वावर मानवी वस्तींमध्ये आढळून येत आहे़ गेल्या वर्षभरात वाइल्ड अ‍ॅनिमल अ‍ॅण्ड स्नेक प्रोटेक्शन सोसायटीच्या वतीने सुमारे ३३९३ सापांना जीवनदान दिले आहे़ तर ४३१ पशू-पक्ष्यांना निसर्गाच्या सान्निध्यात सोडण्यात आल्याची माहिती संतोष थोरात यांनी दिली़हवामानातील बदलांमुळे अनेक साप मोकळ्या वातावरणात बाहेर पडतात़ हे साप प्रामुख्याने मानवी वस्तींमध्ये आढळून येतात़ अशा वेळी नागरिकांकडून त्यांना मारण्याचा प्रयत्न होतो़ परंतु, गेल्या १५ आॅगस्टपासून वर्षभरात वॅस्प्स संस्थेकडून सापांना आणि पशू-पक्ष्यांना वन विभागाच्या परिसरात मुक्त सोडण्यात आल्याची कामगिरी सर्पमित्रांच्या संघटनेने केली आहे़ पुण्याजवळील राजगड, ताम्हिणी घाट, सिंहगड, खानापूर, पानशेत, लोणावळा, भीमाशंकर, मुळशी परिसरातील सापांना आणि पशू-पक्ष्यांना सोडण्यात आले़ यामध्ये ९१३ नाग, ५७२ घोणस, २०४ मण्यार, २९ फुरसे, २३ चापडा आणि २ पोवळा अशा विषारी सापांचा समावेश आहे़ त्याचबरोबर ९९३ धामण, ५८७ तस्कर, १० अजगर १६९ दिवड, १४५ गवत्या, ९१ कवड्या, ६४ मांडूळ, ४७ धुळनागीण, २८ कु करी, ३६ नानेटी, १४ हरणटोळ, २१ डुरक्या घोणस, १७ मांजऱ्या, ९ चित्रांग नायकुळा, ५ रुका, ३ काळतोंड्या, २ पट्टेरी कवड्या, १ बेडोम मांजऱ्या, ७ रसेल कुकरी आणि १ विटकरी बुवा या बिनविषारी सापांचा समावेश आहे़ या कामगिरीत गणेश भुतकर, शेखर जांभूळकर, उमेश तांबे, रमेश भिसे, प्रशांत पवार, ओमकार भूतकर, उमेश काकडे, विकास पवार यांच्यासह सुमारे १८० सर्पमित्रांनी सहभाग घेतला होता़ (प्रतिनिधी)>उपचार : गारुड्यांकडून ४७ साप जप्त>वन्यप्राण्यांमध्ये २ दुर्मीळ हरयाल राज्य पक्षी, ७ मोर, ६५ घार, ३३ घुबड, ९७ पोपट, ३९ पारवे, २५ कोकिळा, २३ साळुंकी, ११ बगळे, ७ धनेश, ११ शिक्रा, १७ बुलबुल, ८ भारद्वाज, ३३ कावळे, ५ गरुड या पक्ष्यांना जीवनदान देण्यात आले आहे़ तसेच ७ घोरपड, ९ हरीण, ६ मुंगुस, ५ माकड, २ शॉमिलिओन सरडा, ११ वटवाघूळ या प्राण्यांचा समावेश आहे़ यापैकी ५० पोपट आणि २ मुंगुस हे पुणे शहरातील घरांमध्ये आणि पेटशॉपमध्ये धाडी मारून जप्त केले़ तसेच नागपंचमी आणि इतर दिवशी गारुड्यांकडून जप्त केलेल्या ४७ सापांवर उपचार करून जगंलात सोडण्यात आले़