शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : शुक्रवार 1 नोव्हेंबर 2024; आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
14
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
15
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
16
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
17
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
18
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
19
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!
20
दिवाळी, छटपूजेनिमित्त मध्य रेल्वेच्या ५८३ गाड्या

अधिवेशन पुन्हा विरोधकांशिवायच

By admin | Published: March 29, 2017 3:47 AM

तीन दिवसांच्या सुट्यांनंतर विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज बुधवारपासून पुन्हा सुरू होणार असले तरी

मुंबई : तीन दिवसांच्या सुट्यांनंतर विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज बुधवारपासून पुन्हा सुरू होणार असले तरी त्यात विरोधी पक्षांचे सदस्य नसतील. कारण विरोधी पक्षांचे सर्व आमदार उद्या नागपुरातून सुरू होणाऱ्या संघर्ष यात्रेत सहभागी होणार आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या १९ आमदारांचे निलंबन मागे घेण्याचे स्पष्ट संकेत सांसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी विधानसभेत दिले होते. तथापि, विरोधकांनी बुधवारी कामकाजात सहभागी व्हावे, अशी अपेक्षाही बापट यांनी व्यक्त केली होती. मात्र, अधिवेशन मुंबईत आणि विरोधक नागपुरात असे चित्र उद्या दिसेल. विरोधी पक्षाने कामकाजावरील बहिष्कार मागे घेतल्याशिवाय १९ आमदारांचे निलंबन मागे घेण्याच्या मूडमध्ये सरकार नाही. एका ज्येष्ठ मंत्र्यांनी लोकमतला सांगितले की, विरोधकांनी सभागृहात येऊन निलंबन मागे घेण्याची मागणी केली तर तशी घोषणा करण्याचा शब्द सरकारच्या वतीने विरोधकांना शनिवारीच देण्यात आले होते. त्यानुसार ते सभागृहात येणे अपेक्षित होते पण ते आलेच नाहीत. तरीही, २९ तारखेला निलंबन मागे घेण्याचे स्पष्ट संकेत आम्ही दिलेले होते. तरीही विरोधक सभागृहात आले नाहीत. त्यांना कामकाजात सहभागी होण्याची इच्छाच नसेल तर ते न येताच निलंबन मागे घेण्याची आम्हालादेखील गरज वाटत नाही. सर्व आमदारांचे निलंबन एकाचवेळी मागे घेण्याची मागणी गटनेत्यांच्या बैठकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली होती. तथापि, सरकारने मात्र निलंबन दोन टप्प्यात मागे घेण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे तिढा कायम राहिला होता. (विशेष प्रतिनिधी) संघर्षयात्रा आजपासूननागपूर : शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि १९ आमदारांचे निलंबन मागे घ्यावे, या प्रमुख मागण्यांसाठी सर्व विरोधीपक्ष आता रस्त्यावर उतरणार असून चांदा ते बांदा संघर्षयात्रा काढण्यात येत आहे. पळसगाव येथून या यात्रेचा शुभारंभ होणार असून ४ एप्रिल रोजी पनवेल येथे समारोप होणार आहे. या यात्रेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री अनिल देशमुख, रमेश बंग, आ. सुनील केदार, नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, अतुल लोंढे सहभागी होणार आहेत.