शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

एफडीएमध्ये १० सीसीटीव्ही बसवणार

By admin | Published: October 01, 2016 1:40 AM

आयपीएस अधिकारी व एफडीएचे दक्षता विभागाचे प्रमुख हरीश बैजल यांच्या कार्यालयाची मोडतोड झाल्याच्या घटनेनंतर अन्न व औषध प्रशासनाने त्वरित कारवाई सुरू केली असून, कार्यालयाची

- अतुल कुलकर्णी, मुंबईआयपीएस अधिकारी व एफडीएचे दक्षता विभागाचे प्रमुख हरीश बैजल यांच्या कार्यालयाची मोडतोड झाल्याच्या घटनेनंतर अन्न व औषध प्रशासनाने त्वरित कारवाई सुरू केली असून, कार्यालयाची इमारत व परिसरात आणखी १० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती विभागाचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.प्रशासकीय जबाबदाऱ्या पार न पाडल्याबद्दल व कर्तव्यात कसूर केल्याबद्दल प्रशासनातील सह आयुक्त, सहायक आयुक्त व औषध निरीक्षक दर्जाच्या १० अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, त्याचा अंतरिम अहवाल शासनास सादर झाला आहे. नोटिसा बजावलेल्या अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरणही दिले असून, या प्रकरणी त्या अधिकाऱ्यांचे कर्तव्य तसेच इतर अनुषंगिक कायदे व नियम तसेच महाराष्ट्र नागरी सेवा नियम अनुषंगाने छाननीचे काम चालू आहे. लवकरच या अधिकाऱ्यांवर पुढील कारवाईबाबतचा अहवाल शासनाकडे पाठवणार असल्याचेही आयुक्त डॉ. कांबळे म्हणाले.याबाबत डॉ. कांबळे यांनी एक निवेदनही दिले असून, त्यात बैजल यांच्या कार्यालयाची मोडतोड बाहेरील व्यक्तीने केलेली नसल्याचे कबूल केले आहे. बैजल यांच्या कार्यालयात मोडतोड झाल्यानंतर स्वत: सीसीटीव्ही फूटेज तपासले, तसेच तंत्र अधिकारी वर्ग १ दर्जाच्या अधिकाऱ्याकडूनही त्याची तपासणी केली. या फूटेजमध्ये कार्यालयाबाहेरील व्यक्तीने सह आयुक्त बैजल यांच्या दालनात प्रवेश केल्याचे दिसून आलेले नाही, असे स्पष्ट करून डॉ. कांबळे पुढे म्हणतात, यात दोन सफाई कर्मचारी व दोन शिपाई यांनीच दालनात प्रवेश केल्याचे दिसत आहे. त्यामुळे घटनेस कोण जबाबदार आहे हे उघडकीस न आल्याने या घटनेचे गांभीर्य पाहता याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर खेरवाडी पोलिसांनी चौकशीसाठी कार्यालयाला एकदा भेट दिल्याचेही त्यांनी म्हटले. तपासाच्या निष्कर्षानुसार कारवाई केली जाईल, तर या घटनेनंतर सुरक्षारक्षकांना सतर्क राहण्याचे निर्देश दिल्याचेही डॉ. कांबळे यांनी त्यात म्हटले आहे.